kalyan Rural  Saam tv
Maharashtra Assembly Elections

kalyan Rural : कल्याण ग्रामीणमध्ये कोण बाजी मारणार? महायुती आणि मविआच्या लढाईत मनसेचं इंजिन सुसाट धावणार का?

कल्याण ग्रामीणमध्ये यंदा मनसेपुढे महाविकास आघाडी आणि महायुतीचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे महायुती आणि मविआच्या लढाईत मनसेचं इंजिन सुसाट धावणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Vishal Gangurde

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी राज्यभरातील विविध भागात दौरे सुरु केले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत संवाद वाढवला आहे. उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा जिंकता आली होती. मनसेला मागील निवडणुकीत फक्त कल्याण ग्रामीण या एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. या विधानसभा मतदारसंघात राजू पाटील यांनी बाजी मारली होती. यंदाही आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी 'एकला चलोरेचा' नारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ९३,९२७ मते मिळवून जिंकले होते. राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा ७,१५४ मतांनी पराभव केला होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर हे ८४,११० मते मिळवून जिंकले होते. त्यांनी मनसेच्या रमेश पाटील यांचा पराभव केला होता. भोईर यांचा ४४,२१२ मतांच्या फरकाने विजय झाला होता.

शिवसेना फुटीनंतर राजकारण बदललं?

शिवसेना फुटीनंतर राज्यातील राजकीय गणिते बदलून गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना दोन गटात विभागली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी भूमिका बदलली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील यांनाच मनसेकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर महायुतीतील जागावाटपात कल्याण ग्रामीणची जागा भाजप, शिंदे गट की अजित पवार गटाला मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. जागावाटपाआधीच या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने चाचपणी सुरु केली आहे.

तिरंगी लढत होणार?

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून माजी उपमहापौर रमाकांत मढवी, राजेश मोरे हे इच्छुक आहेत. मढवी यांनी या विधानसभा मतदासंघात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

दुसरीकडे या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटानेही चाचपणी सुरु केली आहे. कल्याण ग्रामीणमधून ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात मराठी मतांची टक्केवारी अधिक आहे. या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

आगरी मतांचं विभाजन होणार?

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आगरी मतदारांची संख्या उल्लेखनीय आहे. या विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले राजू पाटील, सुभाष भोईर आणि राजेश मोरे हे आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे आगरी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघात इतर भाषिक, धर्मीय मतदार काय भूमिका घेतात, यावर उमेदवारांचं भविष्य ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT