Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार? मातोश्रीवर तातडीची बैठक, आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीसाठी रवाना

Uddhav Thackeray Shiv Sena : नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. शनिवारी मातोश्रीवर रमेश चेन्नीथला बैठकीसाठी गेले होते. पण ही शिष्टाई निष्फळ ठरल्याचं दिसतेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. मविआमध्ये जागावाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये खडाजंगी उडाली होती. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. शनिवारी मातोश्रीवर रमेश चेन्नीथला बैठकीसाठी गेले होते. पण ही शिष्टाई निष्फळ ठरल्याचं दिसतेय.

काल मविआची जागावाटपावर दहा तास बैठक झाली होती. पण जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. त्यामुळे ठाकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतेय. कारण मात्रोश्रीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, संजय राऊत काय म्हणाले ?

काल साधारण दहा तास बैठक झाली, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि त्या बैठकीनंतर आज सकाळी माझं आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेते यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि आज साडेबारा वाजता पक्षप्रमुख यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ चर्चा करू आणि फुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू, असे संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला -

उद्धव ठाकरे यांचा मॅसेज घेऊन आदित्य ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत. शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. रात्री झालेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती मिळाली आहे. संजय राऊत बैठक संपण्याआधीच निघून गेले होते. त्यानंतर तातडीने रात्रीच ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांना मातोश्रीवर आज बैठकीसाठी बोलावलं आहे.

नाशिक पश्चिम जागेवरून रात्रीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक पश्चिम जागेवर ठाकरे सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिलेत. तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. त्याशिवाय विदर्भातील काही जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

SCROLL FOR NEXT