पुरंदर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं पारडं जड असल्याचे दिसतं आहे. त्यामुळे या मदारसंघामध्ये संभाव्य आमदार कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. २० नोव्हेंबरला या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होणार असला तरी सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाजी झेंडे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार होऊ शकतात.
संभाजी झेंडे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांचा पराभव करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाजी झेंडे यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी तगडं आव्हान दिलं होतं. पण मतदारांनी संभाजी झेंडे यांनाच सर्वात जास्त पसंती दिली आहे. पुरंदरचे नागरिक संभाजी झेंडे यांच्या पाठिशी उभे आहेत. पुरंदरमध्ये काटेकी टक्कर होती यामध्ये संभाजी झेंडेंना विजय मिळवण्यात यश मिळू शकते.
संभाजी झेंडे विजयी होण्यामागे काय कारणं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघापैकी पुरंदर महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेला विजय शिवतारे खासदारकीसाठी उत्सुक होते. पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. विधानसभेला विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली. पण मैत्रीपूर्व लढत आपण पाहिली तर विद्यमान आमदार संजय जगताप यांच्याविरोधात अजित पवारांनी संभाजी झेंडे यांना उभे केले.
संभाजी झेंडे यांना अजित पवारांचे विशेष पाठबळ मिळाले. हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघामध्ये आता अजित पवार गटाने चांगला प्रचार केला आाता संभाजी झेंडेंनाच जास्त पसंती मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजी झेंडे आमदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.