Maharashtra Election Campaign 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Maharashtra Election Campaign: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आज संपला. आता उमेदवार मतदारांच्या गाठीभेट घेत आहेत. महायुती आणि मविआच्या नेत्यांनी सभा गाजवल्या. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांनी या काळात टीकांचा तडका दिला.

Bharat Jadhav

रुपाली बडवे, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास म्हणजेच, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यत प्रचार करण्याची संधी उमेदवारांना होती. या प्रचाराच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झंझावती सभा झाल्या.

यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटलांनी ६१ सभा गाजवल्या. प्रचार करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. त्यांनी राज्य पिंजून काढत संपूर्ण राज्यभरात ६४ सभा घेतल्या.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. सोमवार संध्याकाळपासून छुप्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रचारास सुरुवात झालीय. या प्रचारात उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतील. दरम्यान महिनाभरापासून राज्यात सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी, गावभेटींसह राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला. एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.

हा प्रवास त्यांनी 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला असून, उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्‍यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौरकृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा असे अनेक मुद्दे मांडले. लाडकी बहिण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल ६१ सभांना संबोधित करत सभांची एकसष्टी गाठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण असे महाराष्ट्राचे पाचही विभाग पिंजून काढले आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र ३७, मराठवाड्यात ९, विदर्भात २, उत्तर महाराष्ट्र ५, मुंबई - कोकण विभागात ८ सभांचा समावेश होता.

या सभांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. राज्यातील शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा बोजा, सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांना न मिळणारे भाव, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. बेरोजगारीवर बोलताना त्यांनी राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले, राज्यातील पदे कसे रिक्त आहेत, राज्यात गुंतवणूक आणली जात नाही याबाबत सांगितले.

लाडकी बहिण योजनेवर बोलत असताना जयंत पाटील यांनी सामान्य गृहिणी आणि सामान्य जनतेला महागाईचा होणारा त्रास सांगितला. विविध आकडेवारी मांडून महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध विभागात होणाऱ्या भ्रष्टाचार आणि याच भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT