rashmi thackeray 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: रश्मी ठाकरेंचं नाव CM पदासाठी चर्चेत, किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या..

Maharashtra Next CM : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय ठरत आहे. दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणकीचे वारे जारोने वाहू लागले आहे. काही दिवसांत आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाजीमध्ये जागावाटपाटच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याबाबतच्या चर्चेनं जोर धरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय ठरत आहे. दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी महिला मुख्यमंत्री राज्याला मिळणार का? याची चर्चा सुरु होते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान कुणाला मिळणार? (A woman chief minister for Maharashtra?) याबाबत तर्क वितर्क लावले जातात. आताही दावे प्रतिदावेही सुरू आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचं नाव घेत खळबळ उडवली होती. यावरच आता ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी वक्तव्य केलेय.

महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव समोर आले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर रश्मी ठाकरे यांचं नाव समोर आलेय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावरुन वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधलाय. दरम्यान, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, सुनेत्रा पवार यासारखी नावे महिला मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ?

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी रश्मी ठाकरे यांचं नाव मु्ख्यमंत्रिपदाच्या संभाव्य दावेदार म्हणून घेतलं. मात्र कारण नसताना रश्मी वहिनींचं नाव कशाला घेता? असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी वर्षा गायकवाड यांना सुनावलं.

रश्मी ठाकरे या कधीही थेट राजकारणात आल्या नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना त्यांचं नाव यायला कामा नये, असे पेडणेकर म्हणाल्या. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. त्यांनी

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?

सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी नावे चर्चेत आली. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी आपलं मत व्यक्त केले, त्यांनी मविआवर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री फिरत आहेत. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे. शरद पवार सुप्रीया सुळे मुख्यमंत्री करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT