Kishanchand Tanvani SaamTv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : अचानक उमेदवारी माघारी, आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला धक्का

Maharashtra vidhan Sabha elections 2024: छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे १४ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly elections 2024: छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे १४ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत, हे जवळपास निश्चित झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगर मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला होता. त्यावेळी अंबादास दानवे यांनी तनवाणी यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

आता किशनचंद तनवाणी १४ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळा करून घेतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. तनवाणी यांनी उमेदवारी परत करताच त्यांना जिल्हाप्रमुखपदातून मुक्त केले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तणवाणी यांच्नंयातर १८ समर्थक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला. यातील काहींनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी किशचंद तनवणी आपल्या समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

किशनचंद तनवाणी यांनी एक दिवस आधी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हिंदुत्वासाठी माघार घेतल्याचे सांगितले होते.

तनवाणी यांनी अचानक उमेदवारी माघारी घेताच ठाकरेंनी त्यांच्यावर कारवाई करत जिल्हाप्रमुखपदातून मुक्त केले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी जय महाराष्ट्र केला होता. आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या आज दोन सभा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा होत आहेत. वैजापूर मतदारसंघाचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारासाठी वैजापूरमध्ये सकाळी १० वाजता तर कन्नड मतदारसंघाच्या उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारासाठी सकाळी 11:30 ला सभा होणार आहे. वैजापूरमध्ये शिंदे सेनेकडून आपली जागा कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर कन्नडमध्ये उद्धवशेने कडील जागा आपल्याकडे आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र या दोन्ही ठिकाणी अटीतटीच्या लढती होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT