SaamTV  Amit Thackarey
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Amit Thackarey : राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या माहीममध्ये भाजप नेतृत्वाने अमित ठाकरेंना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र कारकर्ते शिंदे गटाच्या सरवणकरांच्या रॅलीत सहभागी झालेत. त्यामुळे भाजपने राज ठाकरेंना धोका दिलाय का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या माहीममध्ये आता नवा ट्विस्ट आलाय.. आधी भाजपने राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंना पाठींबा दिला. मात्र आता शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या प्रचार रॅलीत भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं समोर आलंय.

हा व्हिडीओ पाहा. माहीमचे शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांची ही रॅली सुरुय... या रॅलीत भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडा घेऊन सहभागी झाल्याचं दिसत आहे. यापूर्वी भाजप खासदार नारायण राणेंनी सरवणकरांना खुला पाठिंबा जाहीर केला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीसांनी मात्र राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केलाय...

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजप आणि महायुतीला पाठींबा देत प्रचारसभाही घेतल्या. मात्र त्यानंतर माहीममध्ये विधानसभेला भाजपने अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला असला तरी भाजपचे कार्यकर्ते मात्र सरवणकरांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे लोकसभेला इमाने-इतबारे मदत करणाऱ्या राज ठाकरेंना भाजपने धोका दिल्याची चर्चा रंगलीय.

एवढंच नाही तर भाजपच्या भुमिकेमुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. त्यामुळे दोन ठाकरेंच्या उमेदवारांच्या संघर्षात शिंदेंचा उमेदवाराला मौका मिळणार की काय अशी चर्चा आता यानिमित्तानं रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT