Mahayuti Assembly Election  
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : महायुतीमध्येही विदर्भावरून तिढा, भाजप ५० जागांवर ठाम, त्याग कोण करणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भातील जागावाटपावरुन मविआमध्ये रस्सीखेंच वाद सुरु आहेच. पण आता महायुतीमधील पेच, तिढा समोर आलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. पण दुसरीकडे जागावाटपाचा तिढा मात्र सुटल्याचे दिसत नाही. मविआ आणि महायुती यांचे विदर्भावरुन रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील जागावाटपावरुन ठाकरे आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पण आता महायुतीमध्येही विदर्भातील जागावाटपावरुन तिढा असल्याचे समोर आले आहे.

विदर्भात भाजपने ५० जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्याग करावा लागणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपने विदर्भात ५० हून अधिक जागा लढवण्याचा आग्रह धरलाय. त्यामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार नरमाईची भूमिका घेऊन त्याग कऱणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. अमरावती विभागात भाजपला ३२ पैकी २४ जागा हव्यात. तर नागपूर विभागात ३० पैकी २७ जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला फक्त १० ते १२ जागा येण्याच शक्यता निर्माण झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात शहरची जागा अजित पवार गटाला, बडनेराची जागा अपक्ष रवी राणा तर एकनाथ शिंदे यांना दर्यापूरची जागा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये भाजप तिवसा, धामणगदाव रेल्वे, मेळघाट, वरड-मोर्शी, अचलपूरची जागा लढवणार आहे. बुलडाण्यातील पूसदची जागा अजित पावारांना मिळेल, असा अंदज आहे. तर मेहकर, सिंदखेड राजा आणि बुलढाणा शिंदेंना मिळतील. नागपूर विभागातील रामटेक आणि भंडारा या जागा शिंदेंच्या वाट्याला येतील, तर सडक अर्जुनाची जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT