एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, असं म्हणत भाजप नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपच्या एक है तो सेफ है या भाजपच्या नाऱ्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. भाजपच्या या नव्या घोषणेमुळे झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय घमासान सुरू झालंय. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपांवर भाजपकडून विनोद तावडे यांनी उत्तर दिलं.
राहुल गांधी यांनी भाजपच्या एक है तो सेफ है नाऱ्यावरून घाणाघाती टीका केली होती. त्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी तावडे यांनी काँग्रेसची सत्ता जेथे होती, तेथे अदानी यांनी केलेल्या प्रकल्पांची यादी वाचली.राजस्थान येथे काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी अशोक गहलोत होते, त्यावेळी तेथे ४६ हजार कोटी रुपयांचा सोलर प्रोजेक्ट तयार केला. तेव्हा अशोक गेहलोत हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, मग अदानी कोणाचे? तसेच १६ हजार हेक्टर जमीन गेहलोत यांनी अदानी यांना दिली, असा सवाल विनोद तावडे यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या एक है तो सेफ है या नाऱ्याचं विश्लेषण करताना विनोद तावडे म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या जातिनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवरून मोदींनी हा नारा दिला. समजा ओबीसी गटाला एकूण २९ टक्के आरक्षण असेल तर त्यातील माळी समाज अडीच टक्के असेल तर त्यांना अडीच टक्केच आरक्षण मिळेल.धनगर समाज पावणे टक्के असेल तर त्यांना पावणे दोन टक्के आरक्षण मिळेल.
त्यामुळे त्या जातींना पूर्ण २९ टक्के आरक्षण न देता त्याता जातीच्या टक्केवारीवरून आरक्षण द्यायचे अशी मानसिकता काँग्रेसची आहे, त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवे आहे,असा आरोपही विनोद तावडे यांनी लावला. पण ओबीसी समाज जाती जाती विभागू नये, यासाठी एक है तो सेफ है हा नारा देण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये एक राहिले असते तर कश्मिरी पंडित तेथून बाहेर गेले नसते, अशी अनेक देशभरातील उदाहरणे देता येतील,त्याचमुळे हा नारा देण्यात आल्याचं तावडे म्हणाले.
एक है तो सेफ हा नारा पॉझिटिव्ह आहे, राहुल गांधींनीही तो सकारात्मक पद्धतीने घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचं विनोद तावडे म्हणाले.मुंबईतील धारावी प्रकल्पावरूनही राहलु गांधींनी अदानी आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, साधं सरकारी परिपत्रक वाचलं तरी समजेल की, धारावीची जमीन ही अदानी यांना दिली जाणार नाही.ती जमीन महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राहणार. धारावी विकसीत करण्याचं टेंडर ज्याला मिळणार त्याला मिळणार, असं तावडे म्हणाले.
हे टेंडर जेव्हा काढण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, शरद पवार यांच्या नेते सत्तेत होते, त्यावेळी हे टेंडर काढण्यात आले होते. या टेंडरमध्ये एक कंपनी दुबईची होती, तर एक कंपनी अदानी यांची होती.त्यानंतर रेल्वे ज्या जमिनी दिल्या त्यानंतर टेंडरमध्ये बदल करण्यात आले. मग जे टेंडर ज्याला मिळालं त्याला देण्याचं काम हे या सरकारने केले.
उलट धारावीमध्ये जे लोक राहतात त्यांना घरं मिळतील. जे लोक फर्स्ट प्लोअरवर राहतात, जरी ते अधिकृत नाहीत, त्यांनाही घरे देण्याचे निर्देश या निविदेत देण्यात आलेत. तसचे धारावीमध्ये असलेल्या उद्योगासाठी २०० स्केअर फूट जागा धारावीमध्येच दिली जाणार, अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.परंतु राहुल गांधींना धारावीमधील लोकांना पक्की घरं मिळू द्यायची नाहीत. त्यांना झोपडपट्टीत राहु द्यायचं आहे.
खरं म्हणजे अदानी यांना राहुल गांधी आणि काँग्रेसनेच आणलं होतं.दुबईची सी लिंक कंपनी ही शेखची आहे. त्यांना टेंडर मिळालं नाही. म्हणून राहुल गांधींना राग येतोय का? त्यांना शेख यांना टेंडर द्यायचे होते का? एक है तो सेफ है, आणि यांच्या डोक्यात शेख है असा टोला विनोद तावडेंनी लगावला.
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याच्या आरोपावर उत्तर देताना विनोद तावडे यांनी राहुल गांधींना आव्हान दिले आहे.राहुल गांधींनी उद्योग गुजरात येथे नेले जात असल्याचा आरोप केला.टाटा एअर बस प्लांट गुजरातला गेल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.तावडे म्हणाले, २४ सप्टेंबर २०२१ ला राहुल गांधी यांच्या पक्षाचं सरकार असतानाच हा प्लाट तिकडे जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत दिवगंत रतन टाटा यांचे ट्विट सुद्धा तावडे यांनी वाचून दाखवलं.
फॉक्सकॉन काँग्रेसच्या काळातच या कंपनीचा प्लांट महाराष्ट्र बाहेर गेले. महायुती सरकारच्या काळात एकही प्रकल्प बाहेर गेला नाही. उलट काँग्रेसच्या काळात हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेत. त्यामुळे आपण राहलु गांधींना आव्हान देतो की,त्यांनी समोर यावे आणि महायुतीच्या काळात कोणता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला ते सांगावे आणि त्याचे पुरावे द्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.