cyber police pune saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : खोटी माहिती, व्हिडिओ, बातम्या शेअर करताना सावधान; अन्यथा...

avoid spread of false info : विधानसभा निवडणूक काळात चुकीची माहिती, फोटो, व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर न्यूज शेअर करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाई होऊ शकते.

Nandkumar Joshi

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे

'ऑक्टोबर हिट'चा काळ जवळपास संपला आहे. आता थंडीची चाहूल लागली असून, वातावरणात गारवा पसरणार आहे. पण विधानसभा निवडणूक असल्यानं राजकीय आखाडा तापलेलाच असेल. त्यात सोशल मीडियावर पसरवण्यात येणारी खोटी माहिती, व्हिडिओ आणि काही खोडसाळ वृत्त तर आणखी 'तेल' ओतण्याचे काम करू शकतात. त्यामुळे या निवडणूक काळात चुकीची माहिती, फोटो, व्हिडिओ आणि खोडसाळ वृत्त म्हणजेच बातम्या शेअर करताना सतर्कच राहा. तुम्ही पसरवलेल्या अशा प्रकारच्या माहितीनं तणाव निर्माण होऊ शकतो आणि अशांवर सायबर पोलिसांचा 'वॉच' असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होईल. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. प्रचार तर टिपेला पोहोचला आहे. याच कालावधीत खोटी माहिती, फोटो, व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर शेअर करून तणाव निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत.

संबंधितांवर तात्काळ कारवाई

राज्य आणि जिल्हा पातळीवर सायबर पोलिसांची पथके असतील. सोशल मीडियावर त्यांचे लक्ष असणार आहे. पोस्टमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास किंवा एखाद्या पोस्टमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

नेते, कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही लक्ष

राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही सायबर पोलिसांचे लक्ष असणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. पण सध्याच्या हायटेक युगात उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कंपन्या मतदारांच्या संख्येप्रमाणे 'रेट' ठरवत असून, त्याप्रमाणे पॅकेज घेतले जात आहेत.

निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला आहे. अशावेळी उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते, समर्थक विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर करताना दिसतात. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. ते रोखण्याचे आव्हान असून, विधानसभा निवडणुकीच्या काळात सायबर पोलीस अशा पोस्टवर करडी नजर ठेवणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

Fire Cracker Blast: स्कुटीवरून फटाके नेताना अचानक स्फोट झाला; Video बघून काळजाचा थरकाप उडेल

Maharashtra Politics: काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?

Assembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी पार केलेले 47 हजार मतदार, महिला - पुरुषांची संख्या किती? निवडणूक आयोगाने दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT