अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी
मोदीजी बहण का प्यार सच्चा आहे तर लोकल ट्रेनमध्ये महिलांचा प्रवास मोफत करा असं आव्हान देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदींकडे शक्ती आहे पण ते थापा मारून मारून थकत नाहीत. थापांवर थापा मारणारा माणूस कुठ नसेल. पंतप्रधान मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, मात्र निवडणुकीच्या दिवशी अदृश्य मतदान करू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
एक दिवसापूर्वी महायुतीच्या उमदेवारांसाठी पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कात सभा घेतली होती. त्या सभेत खुर्च्या खाली होत्या. जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. पण निवडणुकीच्या वेळी मते कशी मिळतात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. सभेला गर्दी कमी पण मतदानाच्यावेळी अदृश्य मतदान होते, असं ठाकरे म्हणालेत.
ज्या नरेंद्र मोदींनी नवा शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आपण मुख्यमंत्री पदाच्या काळात यांना पैसे खाऊन देत नव्हतो म्हणून यांनी सरकार पाडले असे घनगत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटावर केला. पुढे बोलताना लोकसभेत गुडघ्यावर आणले आत्ता महायुतीस पाताळात गाडणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
कल्याण पूर्व मतदारसंघात आयोजित सभेसाठी उद्धव ठाकरे कल्याण पूर्वेत आले होते यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटासह भाजपचा जोरदार समाचार घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची नसून महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. एक खासदार ज्याला घरात बसून खासदारकी मिळाली. त्याने जाहिरातबाजी करुन कसा विकास केला आहे हे सांगत आहे.
सभेला येत असताना रस्ते धुळीने खडड्यांनी भरलेले आहेत. वाहतूक कोंडी आहे. त्यांना पैशाचा माज आहे. केलंय काम भारी आत्ता पुढची तयारी अशी जाहिरात त्यांच्याकडून केली जात आहे. पुढची तयारी म्हणजे मोठी गद्दारी अशी टीका ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. माझ्या हिंदूत्वाविषयी बोलणाऱ्यांनी मला हिंदूत्व शिकवू नये, नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापतात. त्यांचे कसले हिंदूत्व. भाजपने माझ्याशी विश्वासघात केला. त्यांना धडा शिकविण्याकरीता मी महाविकास आघाडीत गेलो असेही ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱ्यांच्या विरोधात मी उतरलो आहे. मी त्यांना महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. त्यामुळे त्यांनी माझे सरकार पाडले. यांना सगळ्यात आधी मी मंत्री पद दिले. अन्यथा ते मुख्यमंत्री झाले नसते. गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुलालाही खासदारकीच्या बोहल्यावर मी चढविले. त्यांना मोठे करणारे लोक आजही माझ्या सोबत आहे. ते त्यांना पुन्हा लहान करु शकतात असेही ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.