Assembly Election Tv9
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: मविआत वाद? जागांच्या मागणीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष रुसला, जयंत पाटलांना हव्यात हक्काच्या २० जागा

Jayant Patil: माजी आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या जागांच्या मागणीवरून मविआत वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला हक्काच्या २० जागा सोडण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केलीय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आलाय. निवडणुकीच्या लढाईसाठी वेळ कमी असतानाच नाराजी सत्र मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही जागा वाटपावरून पक्षांची नाराजी समोर येत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप देखील आपल्या हक्कांच्या जागांवरून नाराज असल्याचं दिसत आहे. आपल्या पारंपरिक २० जागा आम्हाला सोडव्यात अशी मागणी जयंत पाटील यांनी केलीय.

विधान परिषदेपासून मविआतील काँग्रेसवर नाराज असलेल्या शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची चिंता वाढवलीय. आपल्या पारंपरिक २० आपल्याला सोडण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केलीय. जर मविआच्या बैठकीत त्यांना या जागा सुटल्या नाहीत तर ते मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का असा सवाल केला जात आहे.

कोणत्या जागा मागितल्या

शेतकरी कामगार पक्षाने साकरी, मालेगाव यातील जागांसह शिंदखेडा ,धुळे ग्रामीण,बागलाण ,नवापूरमधील जागां मागितल्या आहेत. लोकसभेला या जागांवर आम्हाला जास्त फायदा झाला आहे. त्यातील काही मतदार संघ आम्हाला मिळावेत, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. दरम्यान या पारंपरिक २० जागा जागांबाबत महाविकास आघाडीशी चर्चा झाली आहे. अनेक जागा आमच्या काही फरकाने गेल्या आहेत. त्या जागा आम्हाला हव्यात, असं जयंत पाटील म्हणालेत.

जयंत पाटलांची काँग्रेसवर नाराजी कायम

विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील पराभव झाला होता. विधान परिषदेच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला मते दिली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. विधानपरिषदेचा निकाल आल्यापासून जयंत पाटील हे मविआती काँग्रेसवर नाराज आहेत. काँग्रेसने माझा विश्वासघात केला.

विधान परिषदेला मला याचा अनुभव आला आहे. काँग्रेसची मते फुटली. दुसऱ्या पसंतीची मते मला मिळाली नाही म्हणून माझा पराभव झाला अशी खदखद त्यांनी परत एकदा बोलून दाखवलीय.

मुंबईत ठाकरे गट मोठा भाऊ

दरम्यान, महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण झाले आहे. मात्र तीन जागांचा तिढा अद्याप कायम असून तो उद्यापर्यंत सोडवला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील जागांमध्ये शिवसेना ठाकरे गटच मोठा पक्ष असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत अधिक जागा मिळणार आहेत.

आज झालेल्या मुंबईच्या जागावाटपाच्या बैठकीत 36 पैकी 33 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचं एकमत झाले आहे. येत्या दोन- तीन दिवसात जागावाटप आणि काँग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT