Raj Thackeray Vs Eknath Shinde 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Raj Thackeray Vs Eknath Shinde: माहीम विधानसभेच्या जागेवरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सबंध ताणले गेले आहेत.

Girish Nikam

माहिमचे विद्यमान आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. राज ठाकरेही एकनाथ शिंदेंवर सातत्यानं टीका करत आहेत. पाहूया शिवसेना-मनसेतील राजकारणावरचा एक रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष निश्चित झाला आहे. अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहिम मतदारसंघातील तिढा न सुटल्यानं एकनाथ शिंदेंना आता दोन्ही ठाकरें बंधूंविरुद्ध लढावं लागणार आहे. ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आणखी एका ठाकरेंना शिंगावर घेतलं आहे.

माहीमवरुन राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सबंध ताणले गेले आहेत. मात्र राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांतली शिंदे यांच्या विरुद्धची वक्तव्य मनसेची राजकीय रणनिती स्पष्ट करतात. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि तो आमच्या साथीने होईल, असे भाकित राज यांनी वर्तवले आहे. इतकंच नाही तर सोमवारच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, असा घणाघात केलाय. त्याला शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय.

शिंदेंनी माहिममध्ये सदा सरवणकरांची उमेदवारी का कायम ठेवली? शिंदे आणि राज ठाकरेंचे संबंध का ताणले गेलेत? त्याची काही कारणे पाहूया.

भांडुपची जागा शिवसेनेने मनसेसाठी सोडावी, अशी चर्चा होती.

अचानक मनसेने माहीममध्ये अमित ठाकरे यांची घोषणा केली

माहिमवरुन शिवसेनेला अंधारात ठेवल्याने नाराजी

मनसेची भाजपसोबत वाढती जवळीक

राज ठाकरेंच्या काही विधानांवर नाराजी

निवडणुकीनंतर मनसे भाजपसोबत सत्तेत येईल हे राज यांचं मोठं विधान

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुनही राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

लाडकी बहिण योजनेवरही राज यांची टिका

लोकसभेत मनसेनं बिनशर्त पाठिंबा देऊनही महायुतीला विशेष फायदा नाही

शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील प्रचार सभेत ठाण्याची बजबजपुरी झाली आहे. ठाणे बिल्डरांच्या घशात जातेय, असा हल्लाबोल राज यांनी केला. तसेच शिंदेंच्या मंचावर भोजपुरी डान्स ही लाडकी बहीण योजना आहे का ?असा टोलाही लगावला. त्यामुळेच शिंदेंना एकाचवेळी दोन ठाकरेंविरुद्ध लढावं लागतंय.

शिंदे आणि राज यांच्यामधील दरी निकालावर परीणाम करणारी ठरू शकते. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्ह आहेत. नवीन युती किंवा आघाडी होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT