Maharashtra Election  
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: शरद पवार गटाला धक्का; ऐन दिवाळीत मुरबाडमध्ये फुटणार बंडखोरीचे फटाके

Maharashtra Election: मुरबाडमध्ये शरद पवार गटाला मोठा फटका बसणार आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले शराध्यक्ष बंडखोरी करण्याच्या इराद्यात आहेत.

Bharat Jadhav

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

मुरबाड विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी अखेर अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचा दिलेला शब्द न पाळल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं वडनेरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष असलेले वडनेरे मागील अडीच वर्षांपासून आमदारकीची तयारी करत होते. वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या सुभाष पवार यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता वडनेरे यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.

त्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभेत मतांचं विभाजन होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतेय. दरम्यान मुरबाडमध्ये शरद पवार गटाकडून सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय.

या मतदारसंघात आमदार किसन कथोरे आणि सुभाष पवार यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुभाष पवार राजकारणासोबतच त्यांच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत असतात. नवरात्रोत्सवाच्या काळात जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मविआत उमेदवारांची अदलाबदली होणार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ जागांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. पण यामध्ये तीन ते चार नावांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जागावाटपाची चर्चा सुरु असताना ठाकरेंकडून उमेदवाराची यादी जाहीर केल्यामुळे टीका झाली होती. त्यात महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर आला असून ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murbad Politics : मविआतील अंतर्गत बंडाळीनं भाजपच्या कथोरेंचा मार्ग सुकर; शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही विरोध

Maharashtra News Live Updates: मिलिंद नरोटे यांना भाजपकडून गडचिरोलीतून उमेदवारी

Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ करेल मालामाला; करा 'हे' उपाय

Railway Rule: रेल्वे सुटल्यानंतर त्याच तिकीटवर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

SCROLL FOR NEXT