Maharashtra News Live Updates: श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर, लहू कानडेंचा पत्ता कट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 26 October 2024: आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातला पाऊस, मनोज जरांगे पाटील, महायुती-महाविकास आघाडीचा जागावाटप निर्णय आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Mumbai newsL  कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

कोल्हापूर उत्तर येथून कृष्णराज महाडिक इच्छुक

या जागेवर शिंदे यांच्या शिवसेनेचाही दावा

माजी आमदार राजेश क्षीरसागर शिंदे गटाकडून शिवसेनेतून इच्छुक

Ahmednagar News: श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर, लहू कानडेंचा पत्ता कट

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडून धक्कातंत्राचा वापर

विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट

काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी

विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली

काँग्रेस अंतर्गत दोन्ही गटांचा वाद आला होता चव्हाट्यावर

काँग्रेस श्रेष्ठींनी विद्यमान आमदाराला नाकारत नवीन चेहऱ्याला दिली संधी

Latur News: काँग्रेसकडून निलंगा विधानसभा मतदारसंघातून अभय साळुंखेंना उमेदवारी 

काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर

दुसऱ्या यादीत लातूरच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून अभय साळुंखे यांना उमेदवारी

तर भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर तर काँग्रेसकडून अभय साळुंखे मैदानात

Pune News: काँगेसच्या दुसऱ्या यादीत पुण्यातल्या २ मतदारसंघातील उमेदवारची नावं जाहीर नाहीत

काँगेसच्या दुसऱ्या यादीत पुणे शहरातील मतदारसंघातील उमेदवार जाहीर नाहीत

पुण्यातील शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघ याचे उमेदवार अजूनही गुलदस्त्यात

शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटमधून इच्छुकांची संख्या आहे जास्त

तर या दोन्ही मतदारसंघात आयात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे

Mumbai News:  शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

केसरकर आणि राज ठाकरे यांच्यात दोन मिनिटांची चर्चा

दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन आल्याची चर्चा

दादर माहीम मतदारसंघमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध शिवसेना शिंदे गटांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे

त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती

Mumbai News: जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

राष्ट्रवादीच्या सुनिल टिंगरेंना वडगाव शेरी मतदारसंघाची जागा सुटल्याने मुळीक नाराज

मुळीक यांची नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार का? याकडे लक्ष

याआधी जगदीश मुळीक यांच्याकडून दोन-तीन वेळा सागरवर येत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या

मात्र, तरीही ती जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्याने मुळीक नाराज असल्याची चर्चा

Pune News: दिवेघाटात दुधाचा टँकर आणि पीएमटी बसला अपघात

दिवेघाटात दुधाचा टँकर आणि पीएमटी बसला अपघात

दुधाचा टँकर पीएमटी बसला घासून टँकर उलटण्याची घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात घडली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमटी बस वडकीवरून सासवडच्या दिशेला जात असताना झाला अपघात

Nashik News: भाजप आमदार डॉ. राहुल आहेर छगन भुजबळ यांच्या भेटीला

भाजप आमदार डॉ राहुल आहेर छगन भुजबळ यांच्या भेटीला

राहुल आहेर आणि मंत्री छगन भुजबळांची बंद दाराआड चर्चा

राहुल आहेर चांदवड देवळा मतदार संघातून भाजपाचे आहेत उमेदवार

राहुल आहेरांचे भाऊ केदा आहेर यांनी केलंय बंड

चांदवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही

आहेर आणि भुजबळांची भेटीमगाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट

Delhi News: काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज ऑनलाईन बैठक

काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज ऑनलाईन बैठक

दुपारी 12 वाजता ऑनलाईन बैठक होणार

जागावाटपात कठोर भूमिका न घेतल्याने मित्रपक्षांना जास्त जागा सोडाव्या लागल्याने काल राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती नाराजी

त्यानंतर आज पुन्हा होत असलेल्या बैठकीला महत्व

Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीमध्ये खलबतं

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची महायुतीची जागा कोणाला ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

कृष्णराज धनंजय महाडिक ?राजेश क्षीरसागर ? की सत्यजित कदम ?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारा संदर्भात खासदार धनंजय महाडिक घेणार पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेतून खासदार धनंजय महाडिक मांडणार आपली बाजू

धनंजय महाडिक यांच्या पत्रकार परिषदेतून कोल्हापूर उत्तर विधानसभा महायुतीची जागा कोणाकडे जाणार हे होणार स्पष्ट

Mumbai News: भाजपची दुसरी यादी आज येणार

भाजपची दुसरी यादी आज येणार

यामध्ये मुंबईतील वादग्रस्त जागांबाबत आज निर्णय असू शकतो

काल रात्री या संदर्भात उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली

काही जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा तर काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीचीही शक्यता

वरळी शिवडी अंधेरी पूर्व सेनेचा दावा कायम सूत्रांची माहिती

Ratnagiri News: उद्धव ठाकरे सेनेमधून बाळ माने 28 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज

रत्नागिरी- उद्धव ठाकरे सेनेमधून बाळ माने 28 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज

दोनच दिवसांपूर्वी बाळ माने यांनी केला होता उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश

सकाळी 11 वाजता शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज

त्यामुळे रत्नागिरीत आता धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा रंगणार सामना

रत्नागिरी मध्ये शिवसेनेकडून उदय सामंत यांनी काल भरला आपला उमेदवारी अर्ज

त्यामुळे आता रत्नागिरी मध्ये बाळ माने विरुद्ध उदय सामंत असा रंगणार सामना

Mumbai News: विलेपार्ले मतदारसंघाबाबत आज ठाकरे गट निर्णय घेणार

शिवसेना ठाकरे गटातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही

विलेपार्ले मतदारसंघाबाबत आज शिवसेना ठाकरे गट निर्णय घेणार

विलेपार्ले आणि वर्सोवाबाबत आज शिवसेना अधिकृत निर्णय घेण्याच्या तयारीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com