Amravati police Amravati police
Maharashtra Assembly Elections

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

चेकपोस्टवर सोने-चांदीची अवैध वाहतूक होतेय का? अमरावतीच्या वरखेड येथे तब्बल सहा कोटींचे सोनं-चांदी जप्त करण्यात आले.

Namdeo Kumbhar

अमर गटारे, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Election News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांची गस्त सुरू आहे. पुण्यात पाच कोटी आणि सांगलीत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आता अमरावतीमध्ये तब्बल सहा कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरवरून अमरावतीला निघालेल्या गाडीमध्ये सहा कोटी रूपयांच्या किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आलेय. मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समोर आले आहे.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वरखेड येथे चेकपोस्टवर निगराणी पथक व तिवसा पोलिसांकडून सोने आणि चांदी वाहून नेहणाऱ्या वाहानाला पकण्यात आले. या वाहनात चार किलो सोनं आणि चांदी आढळली. याची किंमत अंदाजे सहा कोटींपेक्षा जास्त असल्याचं समोर आलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात तीन व्यक्ती होते. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलेय. सोने-चांदी संदर्भात कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अमरावती जिल्ह्याची सीमा वरखेडपासून सुरु होते. नागपूर वरून हे वाहन अमरावतीकडे येत होतं, दरम्यान अमरावती वर्धाच्या सीमेवर प्रत्येक वाहनांची तपासणी होते. या तपासणी दरम्यान हे सोने चांदी पकडले. पण खरंच हे सोने चांदी अवैध आहे का? याचा तपास सुरू आहे, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने चांदीच्या वाहतूकीने खळबळ उडाली आहे.

जालन्यात तब्बल वीस लाखांचा 80 किलो गांजा जप्त

जालन्यातील बाजीउम्रद येथील एका शेतात जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल वीस लाख रुपयांचा 80 किलो गांजा जप्त केलाय. बाजीउम्रद येथील संशयित आरोपी बद्री पवार हा त्याच्या शेतामध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची शेती करत होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे मौजपुरी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT