Devendra Fadnavis :  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

Maharashtra vidhan Sabha Election : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल? याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अमित शाह यांनी सभेत फडणवीस यांच्या नावाचे संकेत दिलेत.

Snehil Shivaji

Maharashtra assembly elections 2024: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरु होती तो महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणूकांआधीच ठरल्याचे संकेत अमित शाहांनी जाहीर प्रचारसभेत दिले आहेत. भाजपच्या हायकमांडने कोणाला दिली मुख्यमंत्रीपदासाठी पसंती? अमित शाहांनी प्रचार सभेत केलेल्या मोठ्या वक्तव्यानं महायुताल नवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मिळाला असं म्हणायला आता वाव आहे. परंतू प्रचार सभेतील अमित शाहांच्या या वक्तव्यानं महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

मविआ आणि महायुतीनं आपल्या मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत चेहरा जाहीर केलेला नाही. काही दिवसांपुर्वी महायुती शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूका लढेल असं खुद्द फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यामुळे सत्ता आली की शिंदे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती तर महायुतीचा तिसरा भिडू अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांशा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळेच अमित शाहांनी एक पाऊल पुढे टाकत मी राज्यभर फिरलो आणि महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विजयी करा असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडणार असल्याचे संकेत शाहांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांना पसंती का?

नगरसेवक, आमदार म्हणून कामाचा अनुभव

2014 ते 1019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

2022 शिंदेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम

भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं तंतोतंत पालन

संघांचीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक

केंद्रातील सर्व नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध

शिवसेना - भाजप युती तोडण्याचं कारण मुख्यंमत्री पद होतं हे सगळ्यांना माहित आहे. यावेळीही महायुतीनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शाह भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्याचे संकेत देऊन मित्र पक्षांना मानसिक तयारी करण्याचा संदेश देत आहेत का? अशी चर्चा आता सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT