wrestler chandrahar patil comment after declaration candidate for sangli lok sabha constituency
wrestler chandrahar patil comment after declaration candidate for sangli lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Chandrahar Patil : सांगली लाेकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर हाेताच नाराज काॅंग्रेसवर चंद्रहार पाटील स्पष्टच बाेलले

विजय पाटील

Sangli Lok Sabha Constituency :

सांगली लाेकसभा मतदारसंघात पैलवान चंद्रहार पाटील (Wrestler Chandrahar Patil) यांना महाविकास आघाडीची (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी मिळताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फाेडून जल्लाेष केला. ही जागा काॅंग्रेसला मिळावी यासाठी काॅंग्रेस नेत्यांचा आग्रह हाेता. परंतु चंद्रहार पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान साम टीव्हीशी बाेलताना पैलवान चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल. ते मला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी मधील काॅंग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काॅंग्रेसची मागणी हाेती. आज (बुधवार) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केली.

चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसमधील नाराजी अद्याप दूर झालेली नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते दिल्ली येथे काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना भेटायला गेले आहेत. इकडे ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रहार पाटील साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले महाविकास आघाडी म्हणून सर्व मला पाठिंबा देतील. खासदारांनी जी कामे केली नाहीत ती पूर्णत्वास नेईन. सांगली येथे विमानतळ हाेण्यासाठी प्रयत्न करेन.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे सांगलीला विमानाने उतरतील असेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी मला पाठिंबा देईल. प्रकाश आंबेडकर यांनी मला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे असेही शिवसेना ठाकरे गटाचे सांगली लाेकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: भारतात सर्वात जास्त घटस्फोट 'या' कारणांमुळे होतात

Today's Marathi News Live : कोल्हापूर परिसरात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा

Abhidnya Bhave : अरेच्चा! 5 मिनिटांत अभिज्ञाने कमी केलं ३ किलो वजन

Team India News: T-20 WC तोंडावर असताना BCCI नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात; राहुल द्रविडबाबत जय शहांचं मोठं विधान

Lok Sabha Elections 2024: पुण्यात २ दिवस बेकायदेशीर जमाव, सभा अन् बैठकांना बंदी, कारण काय?

SCROLL FOR NEXT