Prakash Ambedkar Manoj Jarange Saam TV
लोकसभा २०२४

Manoj Jarange News: मनोज जरांगे वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमुळे चर्चा

Jalna Lok Sabha Elections 2024: मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Manoj Jarange Patil Latest News

मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. २६) रात्री अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी तसे संकेत दिले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीसंदर्भात आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून त्यांची पुढील वाटचाल नेमकी कशी असेल, याबाबत चर्चा केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. आमची चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच याबाबत निर्णय जाहीर करू, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट असून आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे. मी समाजाला ३० तारखेपर्यंत निर्णय देतो असं सांगितलं आहे, त्यामुळे मी आज काय चर्चा झाली हे ३० तारखेलाच सांगणार, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

मी स्वार्थी नसून मला कुठलंही राजकारण करायचं नाही. माझा उद्देश सामाजिक चळवळीचा असून मी जनआंदोलनातून गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक मतदारसंघातील एक अपक्ष उमेदवार देण्याबाबत आमचा निर्णय झाला आहे. यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन विचारणार आहोत, असंही जरांगे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी अचानक जरांगेंची भेट घेऊन लोकसभेबाबत चर्चा केल्याने मनोज जरांगे हे जालन्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT