PM Narendra Modi Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Wardha Politics: सभा PM मोदींची अन् फोटो झळकले राहुल गांधींचे; वर्ध्यात उलटसुलट चर्चांना उधाण

PM Narendra Modi Sabha Wardha: वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्ध्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Rohini Gudaghe

चेतन व्यास साम टीव्ही, वर्धा

राज्यात आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर वर्ध्यामध्ये (Wardha Politics) भाजपच्या सभेत कॉंग्रेसचा प्रचार होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi Sabha) सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्ध्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधी आणि पंजा चिन्हाचा प्रचार होत असल्याचं दिसत आहे. यवतमाळनंतर तळेगाव येथील सभेत खुर्च्यांवर काँग्रेसचा प्रचार होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार तर नाही ना? असा सवाल निर्माण होत आहे.

काही खुर्च्यांवरवरील राहुल गांधीचे फोटो स्टिकर काढले असले, तरी काही खुर्च्यांवर मात्र राहुल गांधी आणि पंजा चिन्ह स्पष्ट दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं (Rahul Gandhi Photo On PM Modi Sabha) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात आहेत. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी जाहीर सभा होत (Maharashtra Lok Sabha Election) आहे. त्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या खुर्च्यांवर चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांच्या पंजा चिन्हाचे स्टिकर लावलेले असल्याने खळबळ उडाली आहे.

काही खुर्च्यांवरील स्टिकर अर्धवट फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजा चिन्ह दिसून येत आहे. यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचे प्रचार तर सुरू नाही ना? अस प्रश्न पडत आहे. मोदींच्या सभेत (PM Modi) राहुल गांधींचे फोटो झळकल्यामुळे मोठी खळबळ वर्ध्यामध्ये उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

Maharashtra Live News Update : गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, ख्रिस्ती बांधवांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

SCROLL FOR NEXT