Vishal Patil from Sangli  Saam tv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : सांगलीत 'बंडाचा झेंडा' कायम! विशाल पाटील यांची माघार नाहीच; महाविकास आघाडीला धक्का

Sangli Loksabha Constituency News: विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता वाढली असून पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विजय पाटील

सांगली|ता. २२ एप्रिल २०२४

सांगली लोकसभा मतदार संघात अखेर तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीमधून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता वाढली असून पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सांगलीत बंडाचा झेंडा...

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने विशाल पाटील काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे.

तीन पाटील लोकसभेच्या आखाड्यात..

विशाल पाटील यांनी बंडाचा इशारा दिल्यापासून काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मात्र विशाल पाटील यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचे दिसत आहे. त्यामुळे सांगलीमध्ये आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.

चिन्ह कोणते?

दरम्यान, विशाल पाटील यांनी बंडखोरी करताच सोशल मीडियावर बंडखोरी सांगलीची परंपरा अशा आशयाचे मेसेज फिरायला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप सुरू आहे. यामध्ये विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर यांपैकी एका चिन्हाची मागणी केली आहे.

विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले असून, त्यांनी मागणी केलेल्यांपैकी एकही चिन्ह त्यांना मिळू शकले नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर ही चिन्हे मागितली होती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT