vinayak raut criticises eknath shinde and devendra fadnavis in malvan ratnagiri sindhudurg constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Vinayak Raut: भूमाफियांसाठी शिंदे-फडणवीसांनी आखला मोठा डाव: विनायक राऊतांनी जीआर सांगितला

ratnagiri sindhudurg lok sabha constituency: मालवण शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या वतीने मालवण शहरात नुकतेच रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency:

संपुर्ण कोकण किनारपट्टी व लगत असलेल्या गावातील जांभा दगड खाणी भूमाफियांच्या घशात घालण्याचा कुटील डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आखल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केला आहे. ते मालवण येथे माध्यमांशी बाेलत हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालवण शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या वतीने मालवण शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

विनायक राऊत म्हणाले 4 मार्च 2024 ला या सरकारने जीआर काढून संपूर्ण कोकण किनारपट्टी सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून भुमाफीयांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. यावेळी विनायक राऊत यांच्या समवेत कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

उद्धव ठाकरेंची आज कणकवलीत सभा

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली येथे प्रचार सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतील होमपिचवर ही सभा होत असून राणेच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ही सभा होणार आहे.

ज्या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांची सभा होते आहे त्याच ठिकाणी उद्या राज ठाकरे व नारायण राणे यांची सुद्धा सभा होणार असल्याने आजच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं कोणाला टार्गेट करताहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा लक्षवेधी सामना होतोय. त्यामुळे आजच्या सभेला महत्त्व प्राप्त झाल आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: शालिमार एक्स्प्रेसमधून ८.५ किलो गांजा जप्त; कल्याणमध्ये GRPF पोलिसांची मोठी कारवाई|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं आणि मारण्याचा प्रयत्न केला - प्रवीण गायकवाड

Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

Khakhra Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Aids: किती पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एड्सचा धोका संभावतो?

SCROLL FOR NEXT