Uddhav Thackeray  Saam Digital
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : घरी गेलं की आई विचारते नोकरी मिळाली का? तुमच्या नादी लागून १० वर्ष गेली; पालघरमधून उद्धव ठाकरे कडाडले

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी आणि अमित शहा आज महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. २ कोटी रोजगार देणार होता त्याचं काय झालं? असा सवाल त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

नरेंद्र मोदी आणि अमित शहा आज महाराष्ट्रात मतांसाठी दौरे करत आहेत, सभा, रोड शो करत आहेत. मात्र तरुण आज नोकरीसाठी वणवण फिरत आहेत, देशातल्या तरुणांना २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. घरी गेल्यावर आई-वडील विचारतात नोकरी मिळाली का? तुम्ही दिलेल्या आश्वासनांच्या नादी लागून त्या तरुणांची १० वाया गेल्याची घणाघाची टीका आज उद्धव ठाकरे यांनी केली.

किती वेळा तुम्हाला एक्सटेंशन द्यायचं कायमस्वरूपी रोजगार तुम्ही आणतच नाही कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती सुरू आहे.अग्निवीर चार वर्षासाठी त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला की तू जा तुझ्या घरी अशी तुमची भूमिका आहे. मग तुमचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द करू नये? असा सवाल ठाकरेंनी केला.

प्रफुल पटेल विमान खरेदी घोटाळ्यासाठी प्रसिद्ध, पण त्यांना क्लीन चिट दिली. 2019 च्या सभेत मी त्यांचा लहान भाऊ होतो. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले.त्यावेळी शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहिली नसती तर देशाच्या पाठीवर तुमचा उदय झाला नसता. तुम्ही शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला.ज्या शिवसेना प्रमुखाच्या पुत्राने तुमच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केलीत्याला तुम्ही बालासाहेब की नकली संतान म्हणतात?

१०० दिवस मागितली पण ३००० दिवस झाले पण काळापैसा आला कुठे? नोटबंदीमध्ये रांगेत लोक मेले त्यांचं काय? प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधली, अक्षरशह: कोणवडे बांधले आहेत. नुसत्या विटाच आहेत पाणी नाही वीज नाही. लक्ष्मीबाईला हक्काचा घर मिळाले जाहिरात आली व 25 लाख कुटुंबांना घर मिळाले, पण जेव्हा तिला शोधून विचारले तेव्हा कळाले की ते घर भाड्याचं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ, महिलेने विषप्राशन करून संपवली आपली जीवन यात्रा

Maharashtra Live News Update : वसईत क्लोरिनच्या सिलिंडरची गळती, एकाचा मृत्यू

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

SCROLL FOR NEXT