Uddhav Thackeray On Pm Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Uddhav Thackeray On Pm Modi: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हाती घ्या मशाल विजयी करा मशाल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आज ठाकरे गटाची रत्नागिरी येथे सभा पार पडली.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray On Pm Modi:

मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हाती घ्या मशाल विजयी करा मशाल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आज ठाकरे गटाची रत्नागिरी येथे सभा पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

मोदी यांना टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले की, एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचार. शिवसेनासोबत असताना मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात कमी यावं लागत होतं. यंदा अबकी बार तडीपार भाजपला निर्यात करुन टाका, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

नारायण राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ''भाजपच्या कुवतीप्रमाणे त्यानं लघू आणि सुक्ष्म मंत्रालय दिलं.'' ते म्हणाले, शिवसैनिकांची घराणेशाही चालत नाही, वडीलांचा फोटो चालतो. गुंडाची घराणेशाही चालते. अटलजींना वाईट वाटत असेल.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर जीएसटीमध्ये बदल घडवणार. जे मी बोलतो, ते मी करुन दाखवतो. दहावर्षाच्या थापा एका बाजूला एकाबाजूला मी. अख्खा कोकण यांनी विकला काढलाय. परप्रांतियांना जमिनी विकायला काढल्या आहेत.'' ते म्हणाले, गेल्या वेळी माझी चुक झाली मोदींना पंतप्रधान करायला सांगितलं होतं.

याच सभेत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, कोकणचा परिवार विनायक राऊत यांचा नाही बाळासाहेब ठाकरेंचा आहे. कोकणच्या संस्कृतीला गालबोट लावणार पाप केलं नाही, पावित्र राखलं. मी केलेलं काम लोकांसमोर आहे. संसदेत विविध प्रश्न संसदेत मांडले. कोकण किनारपट्टीसह सह्याद्रीमध्ये पर्यटन राबवण्याच काम केलं. कोकण म्हणजे त्यांना (महायुतीला) सोन्याची कोंबडी वाटते. आंबा काजू उत्पादकांचे विविध प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, असं म्हणत त्यांनी महायुतीच्या सरकारला लक्ष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT