Uddhav Thackeray In Panvel Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: शहांच्या पुत्र प्रेमामुळेच भारत वर्ल्डकपमधील अंतिम सामना हरला; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Uddhav Thackeray In Panvel : पनवेलमधील ४ नगरसेवकांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अमित शहांवर टीका केलीय. नवीन मावळे ठाकरे गटात आल्याने पनवेलमध्ये आम्हाला नवीन ताकद मिळाल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलंय.

Bharat Jadhav

पनवेल: पनवेलमधील ४ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची 'मशाल' हाती घेतली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. पक्ष फोडण्याचे काम भाजप करत नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटण्यामागे त्यांचे पुत्र प्रेम जबाबदार असल्याचं शहा म्हणाले होते. अमित शहांच्या या विधानाचा समाचार उद्धव ठकारेंनी पनवेलमध्ये घेतला. शहांच्या पुत्र प्रेमामुळे भारताने वर्ल्डकपचा अंतिम सामना गमावला, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

आज पनवेलमधील ४ नगरसेवकांनी आणि काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पनवेल विधानसभेतील भाजपच्या माजी नगरसेविका लीना गरड, मनसे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रशांत अनगुडे, रायगड मनसे चित्रपट सेनेचे अरविंद घेवडे, मनसे कामगार सेनेचे रायगड संघटक रमजान मेवेकरी, सुरक्षा सेनेचे दिनेश पवार यांनी आज शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहबे ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

या नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घाणाघाती टीका केली.लोकसभा निवडणूक जवळ-जवळ येत असताना अनेक मावळे ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. केंद्र बदलणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नेते ठाकरे गटात येत आहेत, असं ठाकरे यावेळी म्हणालेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

निवडणुकांच्या तोंडावर भाजप जाहीरनामा जाहीर करत असते. मोठं-मोठी आश्वासनं देत जनतेची दिशाभूल भाजपकडून केली जाते,असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्यानंतर त्यांनी अमित शहा यांच्या आरोपाचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते अमित शहा

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्राचरार्थ भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये शहा यांची सभा झाली होती. या सभेत राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटीवरून त्यांनी भाष्य केलं. भाजप पक्ष फोडण्याचे कामे करत नाही. शिवसेनेत फुट पडण्यामागे उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम कारणीभूत आहे. त्यांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेत फुट पडल्याचं शहा म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT