MP Sanjay Mandlik  Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Mandlik: महाराजांबद्दल संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य, राजकीय वर्तुळ ढवळलं; विरोधकांसह महायुतीचे नेतेही संतापले

Priya More

MP Sanjay Mandlik Controversial Statement:

कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत. संजय मंडलिक यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आहे तर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'कोणाच्या गादीबद्दल बोलणे हे त्यांना शोभा देत नाही. शिवाजी महाराजांच्या वंशजांचा सन्मान संपूर्ण समाजाने केला आहे. ते त्यांचे वंशज आहेत की नाही हे बोलण्याचा त्यांना कोणीही अधिकार दिलेला नाही. कृपया राजकारणामध्ये असे वक्तव्य करू नये. त्यांना वाटत असेल लोकं त्यांच्यासोबत जातील तर लोकं त्यांच्याविरोधात जातील. म्हणून राजघराण्याच्या गादीबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलणं योग्य नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न असला तरी देखील ते बोलले हे चूकीचे आहे. हा निषेधच आहे.'

भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सामटीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'संजय मंडलिक यांना काही कळतं का?' उदयनराजे भोसले यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. शाहू महाराजांची गादी ते चालवत आहेत. छत्रपती शाहू महाराज संपूर्ण देशाचे मार्गदर्शन करणारे एक राजे होते. आज त्यांच्या गादीचा असा अवमान करण्याचे पाप जर उमेदवारी करणारे करत असतील तर कोल्हापूरकर त्यांना त्यांची योग्य जागा दाखवतील. कोल्हापूरच्या जनतेची ज्यावर श्रद्धा आहे. त्याला तडा देण्याचे काम समोरच्या उमेदवारांकडून सुरू आहे. त्यांची प्रतिमा भंग करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. कोल्हापूरची जनता हे मान्य नाही करणार. त्यांना पडायची त्यापेक्षा कमी मतं यामुळे पडतील.'

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सांगितले की, 'हे वक्तव्य अंत्यंत निषेधार्य आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचे ते थेट वंशज आहेत. लोकसभेच्या अनुषंघाने ज्याला निवडणूक लढवायच्या असतील तो लोकशाहीमधील सर्वस्वी अधिकार आहे. पण टीका करताना थेट छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल असे वक्तव्य होत असेल तर मी या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांचे हे वक्तव्य कोणीही स्वीकार करणार नाही. त्यांनी असे वक्तव्य करताना भान ठेवावे.'

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, 'मंडलिकांची कार्यपद्धती मी २०२९ मध्ये अनुभवली आहे. ते काय बोलू शकतात याचा मला अंदाज आहेत. ते संध्याकाळी ६च्या नंतर बोलले की दिवसा बोलले हे एखदा तपासावे लागेल. वक्तव्य निषेधार्य आणि निंदनीय आहे. महायुती त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी करणार नाही. या सर्वांची उत्तरं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देत प्रतिक्रिया दिली पाहिजे. त्यांची छत्रपती शाहू महाराजांबद्दल काय भूमिका आहे हे त्यांनी सांगावी. भाजपकडून वारंवार भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अवमान झाला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी कोणी शाहू महाराज आणि त्यांच्या वंशाजांचा अवमान करत असतील तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही.'

भाजपचे नेते प्रविण दरेकर म्हणाले की, 'अशाप्रकारचे वक्तव्य करणं योग्य नाही. राजेंबद्दल असं बोलणं उचित ठरणार नाही. महाराष्ट्राला सुसंस्कृत परंपरांचा वारसा आहे. पण अशाप्रकारे सुसंस्कृत नेते अनेकदा बोलत आहेत. पवारसाहेबांनी साताऱ्यामध्ये घेतलेली भूमिका, संजय राऊतांनी वंशजांचे पूरावे मागितले होते. अशाप्रकारे आपण श्रद्धास्थानी मानतो त्यांच्याबद्दल बोलणं उचीत नाही. त्यांच्या मनामध्ये राजघराण्याबद्दल काहीतरी असेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT