Uddhav Thackeray, Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: ठाकरेंनंतर सुप्रियांकडे मुख्यमंत्रिपद? दादांना डावलून सुप्रियांसाठी पवारांची खेळी?

Ajit Pawar News: लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपलंय. मात्र आरोप-प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटांचा सिलसिला काही थांबायला तयार नाही. यात सर्वाधिक आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचं दोन्ही गट अजित पवार गटानं शरद पवारांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय.

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपलंय. मात्र आरोप-प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटांचा सिलसिला काही थांबायला तयार नाही. यात सर्वाधिक आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचं दोन्ही गट अजित पवार गटानं शरद पवारांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. यावेळचा गौप्यस्फोट हा थेट मुख्यमंत्रिपदाबाबतचा आहे.

महाविकास आघाडीच्या प्रयोग होत असताना पडद्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमध्य एक गुप्त डील सुरू होतं आणि ही डील अजितदादांना डावलून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्याची होती असा, दावा अजित पवार गटानं केलाय.

अजित पवार गटाचेप्रवक्ते उमेश पाटील यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरेंना अडीच तर सुप्रिया सुळेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याची गुप्त डील झाली होती.

गेल्या आठवड्यात पवारांनी 2004 साली राष्ट्रवादीनं जास्त जागा असूनही मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही याचा पहिल्यांदाच खुलासा केला. त्यात त्यांनी अजित पवार ज्युनिअर असल्याचंही नमूद केलं होतं. त्यामुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचा अजित पवार गटाच्या आरोपांमधली हवाच निघाली होती. त्याला उत्तर देण्यासाठी आता अजित पवार गटानं नवा गौप्यस्फोट केलाय.

पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी केल्या. मात्र तीन वेळा उपमुख्यमंत्रिपदाचा अनुभव असूनही अजितदादांऐवजी सुप्रिया सुळेंचं नवा पुढं केलं असा दावा केलाय. मात्र हा दावा पवार गटानं फेटाळून लावलाय.

मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळेच 2019 मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. आता 2019 मधील सत्तासंघर्षाच्या इतिहासाची पानं पुन्हा उघडून मुख्यमंत्रिपदाचा वादाचं नवा अध्याय सुरू केलाय. अजित पवार गटाच्या अजितदादांवरील अन्यायाच्या नॅरेटीव्हवर आता पवार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Maharashtra Live News Update: मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

Dink Ladoo: साजूक तूपातला डिंकाचा लाडू कसा बनवायचा?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

SCROLL FOR NEXT