Madha Lok Sabha Saam TV
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha: माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वरुप जानकरांची एन्ट्री; बसपाकडून भरला उमेदवारी अर्ज

Swarup Jankar : बहुजन समाज पार्टीकडून स्वरूप जानकर माढा लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. चुलत्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आजोबांच्या पक्षाकडून निवडणूक लढत असल्याची भावना यावेळी स्वरुप जानकर यांनी व्यक्त केलीये.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर यांनी माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. बहुजन समाज पार्टीकडून स्वरूप जानकर माढा लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. चुलत्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आजोबांच्या पक्षाकडून निवडणूक लढत असल्याची भावना यावेळी स्वरुप जानकर यांनी व्यक्त केलीये.

महादेव जानकर यांनीही नांदेड लोकसभा निवडणूक बसपाकडून हत्ती चिन्हावर लढवली होती. महादेव जानकर यांनी सत्तेसाठी तडजोड केली आहे. मात्र त्यांची वैचारिक बांधणी ही बहुजनवादीच आहे, अंस स्वरुप जानकर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच स्वरुप जानकर बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. रासपचे नेते महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीवर पुतणे स्वरुप जानकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच माढ्यातून लोकसभा लढवणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र स्वरुप जानकर नेमके कोणत्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट नव्हतं.

अशात आता त्यांनी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. स्वरुप जानकर यांना बहुजन समाज पार्टीने तिकीट दिलं आहे. माढ्यातील विविध प्रश्न, तसेच बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आपली भूमिका असल्याचं उमेदवारी अर्ज भरताना स्वरुप जानकर यांनी सांगितलं.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीने भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलीये. तर महाविकास आघाडीने धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीये. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशिल मोहिते पाटील यांच्यासह आता स्वरुप जानकरही माढा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथे मोठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT