Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
लोकसभा २०२४

Ahmednagar Politics : ...तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही; सुजय विखेंचं निलेश लंकेंना ओपन चॅलेन्ज

Sujay VIkhe Patil vs Nilesh Lanke : मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात | अहमदनगर

Ahmednagar News :

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिलं आहे.

मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांनी हे आव्हान दिलं आहे. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असं सुजय विखेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुजय विखेंचं हे चॅलेन्ज निलेश लंके स्वीकारतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT