Supriya Sule Vs Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यांसमध्ये भरसभेतून शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम भरतायत. मात्र आता दादांच्या दमबाजीला उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळेच मैदानात उतरल्या आहेत.

Satish Kengar

Supriya Sule Vs Ajit Pawar:

>> विनोद पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार दौऱ्यांसमध्ये भरसभेतून शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम भरतायत. मात्र आता दादांच्या दमबाजीला उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळेच मैदानात उतरल्या आहेत. दादांनी निलेश लंकेंना भरसभेतून दम दिल्यानंतर सुप्रीया ताईही नगरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत लंकेंची ढाल बनून पुढे आल्या आहेत. एवढंच नव्हे तर ही दमदाटी तुमच्या घरात करा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सुनावलंय.

काय म्हणाले होते अजित पवार?

निलेश लंके यांचं नाव घेत अजित पवार म्हणाले होते की, ''निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच.''

यावरच उत्तर देत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''निलेश भाऊंना कोणी दमदाटी केली, तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी आहे.''

बारामतीचं मतदान संपल्यानंतर इतर मतदारसंघात प्रचारासाठी बाहेर पडलेले अजित पवार अधिकच आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवारांसह आमदारांना ते भर सभेतून दम भरतायत. शिरूरचे उमेदवार कोल्हे आणि शिरूरचे आमदार अशोक पवारांनंतर अहमदनगरच्या जाहीर सभेत अजित पवारांनी शरद पवार गटाचे उमदेवार निलेश लंकेंवर शेलक्या शब्दात टीका करत दमबाजी केली.

निलेश लंके यांना उद्देशून अजित पवार म्हणाले होते की, ''तुझा असा कंड जिरवेल की तुला सतत अजित पवार दिसेल.'' यावर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादांसोबत गेलेले आणि लोकसभा लढवण्यासाठी थेट आमदारीवर पाणी सोडून शरद पवारांकडे परतलेल्या निलेश लंकेंनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ही धनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढाई आहे.

दरम्यान, लंके विरुद्ध विखे यांच्यात अहमदनगरमध्ये चुरशीची लढत होत आहे. दोघांच्याही एकमेकांवरील टीका राज्यभर चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. मात्र आता नगरच्या मैदानात दादा आणि ताई आमनेसामने आल्यामुळे या लढतीला आणखीनं धार चढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT