Bhavana Gawali
Bhavana Gawali  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: 'कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीशी यवतमाळ-वाशिम जिल्हा'; भावना गवळींच्या समर्थकांची पोस्टरबाजी

Rohini Gudaghe

संजय राठोड साम टीव्ही, यवतमाळ

Yavatmal Washim Lok Sabha Constituency

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये भावना गवळींच्या (Bhavana Gawali) समर्थनात एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असल्याची ही पोस्ट व्हायरल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.  (latest politics news)

भावना गवळींच्या समर्थनार्थ व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय? तर 'कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीमागे उभा आहे यवतमाळ - वाशिम जिल्हा' अशा स्वरूपाची ही पोस्ट (Bhavana Gawli Social Media Post Viral) आहे. 'भावना गवळी पाटील फॅन' या पेजवर ही पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला पेव फुटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhavana Gawali Social Media Post Viral

सध्या यवतमाळ - वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून (lok sabha) अजून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही भावना पुंडलिक गवळी आणि त्यासमोर धनुष्यबाणाचं चिन्ह असलेली पोस्ट भावना गवळीच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर व्हायरल (Lok Sabha Election 2024) केली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. व्हायरल होत असलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहे. उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच असल्याचं सुद्धा दिसत (Yavatmal Washim Lok Sabha Constituency) आहेत. आता यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या समर्थनात पोस्ट व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचं नाव अजून महायुतीकडून जाहीर झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी (१ एप्रिल) देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली (Lok Sabha 2024) होती.

यवतमाळ - वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी यांना उमेदवारी द्या, अन्यथा आम्ही राजीनामे देऊ असा इशारा देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत दिला (Maharashtra Politics) होता. यवतमाळ - वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांच्या नावाची सध्या सुरू आहे. परंतु आता ही भावना गवळींच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झाल्यामुळे उमेदवारीबाबत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT