Kedar Dighe Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभेत ठाकरे गट वापरणार 'दिघे' कार्ड, केदार दिघे यांना दिली जाऊ शकते उमेदवारी

Lok Sabha Election 2024: खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहीलं आहे. येथूनच आता ठाकरे गट केदार दिघे यांना मैदानात उतरवू शकते, अशी चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Lok Sabha Constituency:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहीलं आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चित झालंय. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जागा ठाकरे गटाकडे आहे. मात्र अद्याप ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झालेला नाही.

ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांच्या पाठोपाठ आता केदार दिघे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख आहेत. त्यामुळे दिघे कार्ड वापरून श्रीकांत शिंदे यांची घोडदौड थोपवण्याचा डाव ठाकरे गटाने टाकल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना केदार दिघे यांनी पक्षात इच्छा अपेक्षेपेक्षा आदेश महत्वाचा असतो. अद्यापी असा आदेश किंवा सूचना आपल्याला देण्यात आलेल्या नाहीत. चर्चा सुरू असल्याचे मलाही माहीत आहे. मात्र असा वरिष्ठांकडून असा कोणताही आदेश नाही, मात्र जर संधी मिळाली तर नक्कीच लोकसभा लढविणार असल्याचे दिघे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा बनला आहे. या मतदार संघात एकीकडे पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून येण्याचा चंग कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बांधला असतानाच दुसरीकडे डॉक्टर शिंदे यांचे विरोधक कोण? या चर्चेला पूर्णविराम मिळण्याचे चिन्ह दिसत नाही. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, वरून सरदेसाई ही नावे महिनाभरापासून चर्चेत आहेत. मात्र अद्याप अधिकृत दुजोरा कोणीही दिलेलं नाही. त्यातच आता कल्याण लोकसभेसाठी डॉ शिंदे यांच्या विरोधात तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण लोकसभा या मुंब्रा कळवापासून अंबरनाथपर्यंत पसरलेल्या मतदार संघात समिश्र मतदार असले तरीही इतक्या वर्षानंतरही धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात ताज्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे चिरंजीव देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आदर्श घेऊन पक्ष चालवत असल्याचे वारंवार अधोरेखित करताना दिसतात. तर पक्ष फूटीनंतर केदार दिघे यांनी ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारत आपण ठाकरे गट शिवसेने बरोबरच असल्याचे दाखवून दिले आहे.

एकीकडे लोकसभा कोण लढवणार हे नक्की होत नसताना आता केदार दिघे यांच्या नावाने जोर धरला आहे. दरम्यान, कल्याण लोकसभा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला मिळाली असून या मतदार संघात पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक शर्थीचे प्रयत्न करणार असून ही लोकसभा आपणच जिंकणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT