shiv sena leader shivaji sawant and ranjitsinh naik nimbalkar meeting held in madha lok sabha constituency
shiv sena leader shivaji sawant and ranjitsinh naik nimbalkar meeting held in madha lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवाजी सावंत- रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अखेर दिलजमाई, शिवसैनिक 'कमळा'चा प्रचार करणार

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारावरुन माढा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेतील (shivsena) अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. यामुळे खूद्द खासदार निंबाळकर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नाराज शिवसैनिकांची भेट घेण्यास प्रारंभ केला आहे. चर्चेतून मार्ग निघतात अशी आशा खासदार निंबाळकर यांना असल्याने त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (shiv sena leader shivaji sawant) आणि शिवसेना पदाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी मेळावा घेऊन खासदार निंबाळकर यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेतील एका गटाने खासदार निंबाळकरांची बाजू उचलून धरली. यामुळे शिवसेनेतच दाेन गट पडल्याचे दिसून आले.

दरम्यान नाराज असलेले शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांची खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच भेट घेतली. आलेगाव येथील साखर कारखान्यावर या दाेन्ही नेत्यांची भेट झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भेटीत शिवसेना पदाधिकारी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे. आता सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी देखील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Voting LIVE : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रोहित पवारांना टोला

पिंपरी चिंचवड : मतदान केंद्रावर गाेंधळ, उध्दव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक

Mumbai Rain: सगळीकडं काळोख...धुराळा अन् तुफान पाऊस, मुंबईतल्या पावसाचं रौद्ररूप पाहा VIDEO मधून

Blood Preasure Problems: रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास तुमच्या जीवनशैलीमध्ये करा 'हे' बदल

Ridhi Dogra: 'असुर' फेम रिद्धीचं वेड लावणार सौंदर्य; चाहते पडले प्रेमात!

SCROLL FOR NEXT