Maharashatra Election
Maharashatra Election saam tv
लोकसभा २०२४

Maharashatra Election: धाराशिवमध्ये दीरविरुद्ध भावजयचा सामना; मात्र दोन्हांची उमेदवारी अडचणीत, काय आहे कारण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dharashiv Loksabha Election Omraje Nimbalkar vs Archana Patil:

धाराशिवमधील ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी अडचणीत आलीय.. सोबतच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रूटी आढळल्या आहेत.. त्यांच्या AB फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहे.. दोन्ही उमेदवारांना चुका दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलीय.. 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पुर्तता झाली नाही तर ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांची उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.. दरम्यान ठाकरेंच्या हमखास खासदाराच्या अडचणीचा आढावा घेऊयात..

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे हमखास खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रूटी आढळल्यामुळे ठाकरेंची चिंता वाढलीय. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याही उमेदवारी अर्जात त्रूटी आढळल्यामुळे सर्वाचंच लक्ष धाराशिवच्या लढतीकडे लागलंय. ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रांमध्ये चुका आहेत.

ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दीर विरुद्ध भावजय असा सामना धाराशिव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा एकदा ओमराजेंना मैदानात उतरवलंय. तर महायुतीत अजित पवारांकडे ही जागा गेली असली तरीही अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय.

धाराशिवच्या मैदानात भावजयविरुद्ध दीर अशी लढत होणार आहे. मात्र उमेदवारी अर्जात त्रुटी आल्यामुळे दोघांचीही अडचण वाढलीय. ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना चूका दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलीय. जर 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पुर्तता झाली नाही तर, ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे येत्या दोन दिवसात ठाकरे आणि शिंदे गटाच्या उमेदवारांची धावाधाव होणार हे मात्र निश्चित.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT