Shirdi Lok Sabha Election 2024 Winner Bhausaheb Wakchaure Saam TV
लोकसभा २०२४

Shirdi Election 2024 Winner: शिर्डीत ठाकरेंची मशाल पेटली; भाऊसाहेब वाकचौरेंचा विजय; शिंदेंच्या शिलेदाराला धुळ चारली

Maharashtra Election 2024 Result: Bhausaheb Wakchaure Won From Shirdi Lok Sabha Constituency | शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, ता. ४ जून २०२४

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला आहे. शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवत शिंदेंना धक्का दिला आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरेंविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. सदाशिव लोखंडे हे दोनवेळा शिर्डीचे खासदार होते. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांना धुळ चारत मोठा विजय मिळवला आहे.

मतमोजणीत वाकचौरेंनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली होती. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ आणि अकोले विधानसभेतून वाकचौरेंना भरघोस लिड मिळाले. याच वाढत्या मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT