sanjay awati challenges sanjaykaka patil sangli lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Sangli Constituency : संजयकाका पाटील भाजप बंडखोर माजी नगरसेवकांचे आव्हान स्वीकारणार?

Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रामुख्याने लढत हाेणार आहे.

विजय पाटील

Sangli Constituency :

कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही. दम असेल तर एका व्यासपीठावर या असे आव्हान खासदार संजयकाका पाटील (mp sanjaykaka patil) यांना भाजपचे बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटी यांनी दिले. विशेष म्हणजे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil sangli) यांच्या मिरज येथील प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी आवटी बोलत होते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रामुख्याने लढत हाेणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पाेहचला आहे. विराेधकांबराेबरच स्वकियांना देखील आवरणे उमेदवारांना कठीण हाेऊ लागले आहे.

खासदार संजयकाका पाटील यांनी दोन वेळा संधी दिलेल्या बाजार बुणग्यांना आता ठेचायची वेळ आली आहे. उद्याच्या राजकारणात त्यांना घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ मिरजेत प्रचारा दरम्यान घेत बंडखोर नगरसेवकांना इशारा दिला हाेता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावर बंडखोर नगरसेवक गटाचे नेते सुरेश आवटी यांनी खासदार संजयकाका पाटलांवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरजेतल्या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी आवटी यांनी कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही,शिवाय दम असेल तर एका व्यासपीठावर या असे आव्हान खासदार संजयकाका पाटील यांना दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT