Sangli Loksabha News:  Saamtv
लोकसभा २०२४

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Loksabha Election 2024: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे,असे विधान ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.

विजय पाटील

सांगली|ता. ५ मे २०२४

वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे,असे विधान ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. वंचित आघाडीने विशाल पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार निशाणा साधला.

वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणत ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच घनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात काय घडलं,की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला,असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ओबीसी, बहुजन, मागासवर्गीय या सर्वांनी मिळुन सुरू केलेली चळवळ एकत्रित चालवली तर चालू शकेल अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी पुनश्च एकदा विचार करून आपला निर्णय मागे घ्यावा,असे आवाहन देखील प्रकाश शेंडगेनी केले आहे. तर आनंदराज आबेडकर यांनी प्रकाश शेडगे याना सांगली लोकसभेसाठी पाठिबा दिल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांनी बदलला पाठिंबा...

दरम्यान, सांगली लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुरूवातीला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सांगलीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचे बंधु प्रतिक पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निर्णय बदलून विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT