rupali chakankar criticizes sushma andhare raigad lok sabha election  Saam Digital
लोकसभा २०२४

सुषमा अंधारेंमुळे मनिषा कायंदेंपासून नीलम गोऱ्हेंपर्यंत सर्वांनी पक्ष सोडला : रुपाली चाकणकर, Video

ज्यांना स्वतःच्या टिकलीची किंमत नाही त्यांनी गुलालाची भाषा करू नये अस सांगताना 2019 च्या निवडणुकीत अंधारे यांना पडलेल्या मतांची आठवण चाकणकर यांनी करून दिली.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad Constituency :

घरणेशाहीवर बोलताना सुषमा अंधारेंनी पहिल्यांना आपण काय बाेलता याचा विचार करावा. उगीच जितकं पाकीट जड तेवढी टीका मोठी असे त्यांचे असल्याचा टाेला रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारेंना लगावला. सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर अंधारे यांनी टीका केली हाेती. त्यास चाकणकर यांनी रायगड मतदारसंघात येथे प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रायगड जिल्ह्यातील माणगावच्या मोर्बा येथील शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर टीका केली होती. सगळीच पदं तुमच्याच घरात मग रायगडकरानी करायचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर गोरेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

सुषमा अंधारे यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर केलेल्या टिकेवर उत्तर देताना चाकणकर यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्यावर निषाणा साधला. आदिती तटकरे यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलय हे सांगताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावर चाकणकर यांनी टिकेची झोड उठवली.

अंधारेंनी आत्मपरीक्षण करावे

15 वर्ष सत्ता मिळाली तरी ओळख निर्माण केली नाही म्हणून 83 वर्षाच्या वडिलांना घेऊन मत मागावी लागतात असे चाकणकर यांनी म्हटले. सुषमा आंधेरे यांच्यावर वैयक्तीक टिका करताना सुषमा अंधारे यांचे रंग रूपा बरोबर मन देखील साफ नाही म्हणून त्यांनी जेंव्हा पक्ष प्रवेश केला तेंव्हा मनिषा काईंदे पासून निलम गोऱ्हे पर्यंत सर्वांनी पक्ष सोडला. तुमच्यात किती आवगुण आहेत याच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला चाकणकर यांनी अंधारे यांना दिला.

गणराज्याची चौकशी व्हावी : चाकणकर

ज्यांना स्वतःच्या टिकलीची किंमत नाही त्यांनी गुलालाची भाषा करू नये अस सांगताना 2019 च्या निवडणुकीत आंधेरे यांना पडलेल्या मतांची आठवण चाकणकर यांनी करून दिली. संतांवर केलेली टिका, भिमा कोरेगाव या मुद्द्यां हात घातत सुषमा अंधारे यांच्यावर टिका करताना गणराज्य संघटनेच्या चौकशीची मागणी चाकणकर यांनी केली. रायगडात गुलाल उधळण्यासाठी येणार असल्याची सांगताना बारामतीत गुलाला उधळण्याचा विश्वास चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT