India Alliance Saam Tv
लोकसभा २०२४

India Alliance: अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तात्काळ सुटका करा; इंडिया आघाडीच्या या आहेत 5 मोठ्या मागण्या

Lok Sabha Election 2024: दिल्लीत महारॅलीला संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी इंडिया आघाडीच्या पाच मागण्या मांडल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

5 Major Demands of India Alliance:

दिल्लीत महारॅलीला संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी इंडिया आघाडीच्या पाच मागण्या मांडल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, इंडिया आघाडीची पहिली मागणी आहे की, लोकसभा निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्यांना सामान संधी आणि वातावरण मिळेल हे सुनिश्चित करावं. दुसरी मागणी म्हणजे निवडणूक आयोगाने आयटी, ईडी आणि सीबीआयची जबरदस्तीने होत असलेली कारवाई थांबवावी.

इंडिया आघाडीची तिसरी मागणी आहे की, हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी. चौथी मागणी आहे की, निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी करणारी कारवाई तात्काळ थांबवावी.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच पाचवी मागणी आहे की, निवडणूक रोख्यांचा वापर करून भाजपने केलेल्या सूडबुद्धी, खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि यासाठी एसआयटी स्थापन करावी.  (Latest Marathi News)

याआधी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. मॅच फिक्सिंग ऐकू येते. यामध्ये अनावश्यक खेळाडू विकत घेऊन दबाव निर्माण करून जिंकणे, यालाच मॅच फिक्सिंग म्हणतात. आजच्या निवडणुकीतही तेच होत आहे. सत्ता त्यांची आहे आणि त्यांनी आमच्या दोन खेळाडूंना तुरुंगात टाकले.

राहुल पुढे म्हणाले की, ते 400 पारबद्दल बोलतात पण ते 180 च्या वर जाणार नाहीत. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्वात मोठ्या पक्षाची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. पोस्टर लावायचे आहेत पण पैसे नाहीत. नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. ते मॅच फिक्स करत आहेत. हे काम नरेंद्र मोदी आणि देशातील काही उद्योगपती करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

SCROLL FOR NEXT