rekha thakur criticized dhananjay munde on bajrang sonwane candidature beed constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

Vanchit Bhajuhan Aghadi: पंकजा मुंडेंसाठी धनुभाऊंची मिलीभगत, मविआचा उमेदवार डमी : रेखा ठाकूर

Beed Lok Sabha Election: बीड लाेकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग साेनावणे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यासह एकूण 97 उमेदवारांनी लाेकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

विनोद जिरे

Beed Constituency :

बीड लोकसभा मतदार संघातील लोकं म्हणतात ही तिरंगी लढत आहे. मात्र ही तिरंगी लढत नाही, यातील महाविकास आघाडीचा उमेदवार डमी आहे. पंकजा मुंडेंचे गाठोडे दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊंनी हे केलंय. बजरंग सोनवणेंना धनुभाऊंनीचं उभा केलंय. कारण तो त्यांचा होता, त्याच्या छातीत अजितदादा अन धनुभाऊ होते असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी जाहीर सभेतून केला.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

बीड लाेकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग साेनावणे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यासह एकूण 97 उमेदवारांनी लाेकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक उमेदवाराने त्याचा प्रचार सुरु केला आहे. यामुळे निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ बीड मतदारसंघात जाहीर सभा झाली. या सभेत वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी मुंडे बंधू भगिनींवर आराेप केले. त्या म्हणाल्या पंकजा मुंडेंचे गाठोडे दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊंनी बजरंग सोनवणेंना उभे केले आहे. त्यामुळं भाजपला पराभूत करायचे असेल तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे. अशोक हिंगेंना निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार करा, असं आवाहन देखील यावेळी रेखा ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT