raju shetti on mahavikas aghadi hatkanangale lok sabha election 2024 Saam TV
लोकसभा २०२४

Raju Shetti: मला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही; राजू शेट्टी धैर्यशिल मानेंवर भडकले; ठाकरेंना दोनवेळा भेटल्याचेही सांगितलं

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Hatkanangale Lok Sabha Constituency :

मला आता कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. हे केस पांढरे झाले ते चळवळीतून आणि अनुभवातून झालेत. मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय आहे ते त्यांनी बघावं अशी टिप्पणी माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी खासदार धैर्यशिल माने (mp dhairyasheel mane) यांच्याबाबत केली. तुम्हांला जाईल तेथे लोक आडवत आहेत आणि मित्र पक्षाचे लोक जवळ करत नाहीत अशी तुमची स्थिती झाली आहे. माझा मतदारसंघात राऊंड झाला असून त्यांचे अजून समजूत काढण्यात दिवस चालले आहेत ते त्यांनी पहावं असेही शेट्टींनी मानेंना म्हटले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

हातकणंगले लाेकसभा मतदारसंघातून (hatkanangale lok sabha election 2024) माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. साम टीव्हीशी बाेलताना ते म्हणाले उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. निवडणूक लढवणं माझं काम आहे आणि निवडणूक लढवणार हे काय आज मी जाहीर केलेलं नाही. किती रंगी लढत का होईना मी मी तयारी करत चाललो आहे. मत विभागणीची चिंता जे उमेदवार उभे करत आहेत त्यांनी करावी मी काळजी का करू असेही शेट्टींनी नमूद केले.

राजू शेट्टी पुढं बाेलताना म्हणाले पहिल्यापासूनच महाविकास आघाडी मध्ये जायचं नाही हा निर्णय पक्क होता. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष राज्यामध्ये होतं तेव्हा उसाची तीन टप्प्यात एफआरपी करण्यात आली होती जो शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता. त्यासाठी आम्हाला संघर्ष करून एक रकमी एफआरपी घ्यावी लागली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शक्तीपीठ महामार्ग करण्याची या सरकारची हिम्मत कशी झाली ते म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्या काळात यासाठी पायघड्या घालून ठेवल्या होत्या. शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला. आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकार मध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो. यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत निवडणुकीत येणार नाही असे आम्ही म्हणालो होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या तीन निवडणुका मी या मतदारसंघातून लढलो आहे. यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही मात्र यामध्ये भाजपच्या मतांचे भर पडले तर निवडणूक सुखकर होईल यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा केली. त्यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो सुरुवातीला अनुकूलता दाखवली मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहित नाही दोन्ही आघाड्यांमधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करत आहेत असेही राजू शेट्टींनी म्हटले.

दरम्यान पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोळवू. त्यांचं आणि आमचा उद्देश एकच होता यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांनी दुसरा उमेदवार दिला याबद्दल माझ काहीही तक्रार नाही असे शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT