raju shetti firm on contesting lok sabha election from hatkanangale constituency  saam tv
लोकसभा २०२४

Raju Shetti : उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये देऊ केलेली उमेदवारी राजू शेट्टींनी नाकारली,कारण ही सांगितलं

Hatkanangale Lok Sabha Consituency : मलकापूर, शाहूवाडी या परिसरात सत्यजित पाटील सरूडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकऱ

Hatkanangale Lok Sabha 2024 :

शेतक-यांनी मला ३० वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे राजकारणासाठी मी शेतकरी चळवळ वा-यावर सोडणार नाही असं माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर (satyajeet patil sarudkar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना गाेर गरीबांचा आवाज संसदेत पाेहचविण्यासाठी सर्वसामान्यांनी ही निवडणुक हाती घ्यावी असे आवाहन केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangale Lok Sabha Consituency) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आज उमेदवार जाहीर केला. या मतदारसंघात उध्दव ठाकरेंनी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मलकापूर, शाहूवाडी या परिसरात सत्यजित पाटील सरूडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.

राजू शेट्टी म्हणाले 5 एप्रिल 2021 कालावधीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली हाेती. याचे प्रमुख कारण म्हणाले तीन तुकड्यात केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्ती करुन शेतक-यांवार केलेला अन्याय. गेल्या तीन वर्षात स्वाभिमानीने स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला हाेता. मतविभागाणी टाळावी यासाठी भाजपला त्याचा फायदा हाेऊ नये म्हणून स्वाभिमानीच्या काही जणांनी मविआचा पाठींबा घ्यावा असा विचार मांडला. मविआ देखील हातकणंगले मतदारसंघात उमेदवार देणार नाही असे सांगत हाेते.

वैयक्तिक फायद्यासाठी काेणत्याही पक्षात नाही : राजू शेट्टी

उद्धव ठाकरे यांच्या बराेबरच चर्चा झाली. या चर्चा सकारात्मक हाेत्या. परंतु नेमंक काय झालं माहिती नाही परंतु ठाकरेंनी अचानक मला मशाल चिन्हावर लढलं पाहिजे असा आग्रह धरला. हा विचार मला पटला नाही. गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीत आहे. मी काेणत्याही राजकीय पक्षात काम केलेले नाही. आम्ही आमचा पक्ष काढला. मी वैयक्तिक फायद्यासाठी मशाल चिन्ह घेणार नाही असे स्पष्ट केले. आज त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. आता ही निवडणुक सर्वसामान्यांनी हाती घ्यावी असेही शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी केली तपासणी, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती

Phone Unlock Tricks: फोनचा पासवर्ड विसरलात? दुकानात न जाता फोन उघडण्यासाठी वापरा 'हे' ट्रिक्स, फोन होईल अनलॉक

Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंचे आंदोलन राजकीय आरक्षणासाठी, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

Solapur DJ Ban : सोलापूरकरांच्या लढ्याला यश; अखेर जिल्ह्यात डीजे बंदी, ६ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणीचे निर्देश

Priya Marathe : मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रिया मराठे कोण होती? अभिनेत्रीविषयी १० Unknown Facts

SCROLL FOR NEXT