Raj Thackeray And Narayan Rane Saam Tv
लोकसभा २०२४

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Raj Thackeray Kankavli Sabha: एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहे. अवघ्या काहीच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत.

Satish Kengar

Maharashtra Politics:

एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहे. अवघ्या काहीच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. नारायण राणे आणि राज ठाकरे यांची मैत्री सगळ्यांनाच माहित आहे. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक टीका आणि आरोप केले, जे ते आजही करत आहेत.

मात्र राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमी ते आदरानेच बोलत आले आहेत. अशातच तब्बल 20 वर्षांनी हे दोन्ही नेते एकाच मंचावर येत असल्याने, ते नेमकं काय बोलतील, कसा असेल हा संपूर्ण प्रसंग, याकडे सगळ्यांचं लक्ष केलं लागलं आहे.

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बांदा येथे दाखल होताच भाजप व मन सैनिकांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळणही करण्यात आली. राज ठाकरे यांची महायुतीला पाठींबा दिल्यानंतर नारायण राणेंसाठी ते पहिलीच जाहीर सभा घेणार आहेत.

राज ठाकरे व नारायण राणे तब्बल वीस वर्षांनंतर जाहीर सभेसाठी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणीच राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

'राज ठाकरे माझे मित्र असून आमचे राजकारणाच्या पलीकडील संबंध आहेत'

दरम्यान, साम टीव्हीशी संवाद साधताना नारायण राणे यांनी त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, '''राज ठाकरे माझे मित्र आहेत. आमचे राजकारणाच्या पलीकडील संबंध आहेत. त्यात मला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. मी त्यांना विचारलं की, कोकणात प्रचाराला येणार का? तर ते हो म्हणाले. कोणतंही राजकारण न करता ते आज कोकणात प्रचारात येत आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT