Rahul Gandhi files nomination form from Wayanad Lok Sabha Constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: राहुल गांधींनी वायनाडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज; मात्र यंदा जिंकणं आहे अवघड, का? ते जाणून घ्या

Wayanad Lok Sabha Constituency: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Satish Kengar

Wayanad Lok Sabha Constituency:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधींसोबत त्यांनी रोड शो केला, जिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

उमेदवारी दाखल करण्याआधी राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, ''मी पाच वर्षांपूर्वी वायनाडमध्ये आलो, तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिले. तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनवलं. वायनाडच्या प्रत्येक व्यक्तीने मला आपुलकी, प्रेम आणि आदर दिला आहे.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल यांनी म्हणाले, "तुमचा खासदार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून पाहत नाही. मी माझ्या बहिणीशी जसा वागतो, तसाच तुमच्यासोबत वागतो. वायनाडच्या घरात मला बहिणी, आई, वडील आणि भाऊ मिळाले. यासाठी मी मनापासून आभार मानतो."  (Latest Marathi News)

केरळमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान

केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या ॲनी राजा रिंगणात आहेत.

यंदाची लढत अवघड

यंदा येथून राहुल गांधींसाठी ही लढत सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे. इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून केरळमधील सीपीआयने राहुल गांधींच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. इंडिया आघाडीचा मुख्य चेहरा डाव्यांशी नाही तर भाजपच्या विरोधात लढला पाहिजे, असा युक्तिवाद सीपीआयने केला. मात्र काँग्रेसचे म्हणणे आहे की, राहुल गांधी हे विद्यमान खासदार आहेत आणि तेथूनच निवडणूक लढवणार आहेत.

अशातच यावेळी राहुल गांधींना फक्त भाजपशीच नाही तर सीपीआयशीही लढावे लागणार आहे. के. सुरेंद्रन हे केरळमधील भाजपचा प्रसिद्ध चेहरा आहेत. 2018 मध्ये सबरीमाला आंदोलनादरम्यान ते खूप सक्रिय होते. 2020 मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2019 मध्ये त्यांनी पाथनमथिट्टा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळवली.

यातच के सुरेंद्रन यांच्यापेक्षा ॲनी राजा हे राहुल गांधींसाठी मोठे आव्हान ठरू शकतात. ॲनी राजा या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. त्या सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आहेत. ॲनी राजा यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Kolhapur News : नाशिकनंतर कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT