Nagpur Lok Sabha: निवडणूक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 News in Marathi: नागपूरमधून एक मोठी समोर आली आहे. काँग्रेसने भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv
Published On

Nagpur Lok Sabha Constituency:

नागपूरमधून एक मोठी समोर आली आहे. काँग्रेसने भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. निवडणुक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसच्या वतीने दाखक करण्यात आली आहे.

काँग्रेने आरोप केला आहे की, १ एप्रिल रोजी भर दुपारी तळपत्या उन्हात वैशाली नगर परिसरात विद्यार्थ्यांना प्रचारासाठी हातात झेंडे बॅनर देऊन उभं केलं होतं. हे सगळे विद्याथी नागपूरच्या एनएसव्हीएम शेळतील आहेत. यामुळे नितीन गडकरी आणि भाजपाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यातील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे ही लेखी तक्रार दाखल केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nitin Gadkari
INDIA Alliance: काश्मीरमध्येही इंडिया आघाडीत फूट? मेहबूबा मुफ्ती तिन्ही जागांवर उमेदवार उभे करणार

निवडणूक आयोगात केलेल्या आपल्या तक्रारीत अतुल लोंढे म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी मी लिहित आहे. माझ्या निदर्शनास आले आहे की, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी निवडणुकीने ठरवून दिलेल्या नियमांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत आहेत.''  (Latest Marathi News)

लोंढे म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असूनही निवडणूक विषयक कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेण्यास मनाई असूनही, भाजप आणि नितीन गडकरी हे त्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करत आहेत.''

Nitin Gadkari
Shiv Sena (UBT) Lok Sabha Candidates List: उद्धव ठाकरेंचे धक्कातंत्र! श्रीकांत शिंदेंविरोधात वैशाली दरेकर मैदानात; लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर

तक्रारीत लोंढे पुढे म्हणाले, ''एनएसव्हीएम फुलवारी शाळेतील शाळकरी मुलांचा उपयोग भाजप आणि त्याचे उमेदवार नितीन गडकरी यांनी १ एप्रिल रोजी वैशाली नगर येथे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झालेल्या प्रचारसभेसाठी केला होता. कायदा आणि नैतिक मानकांबद्दलची ही स्पष्ट अवहेलना गंभीर आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.'' असं म्हणत त्यांनी नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई करावी अशी, मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com