Madha Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha: माढा लोकसभा मतदारसंघातून मविआचा उमेदवार कोण? शरद पवार गटाकडून या नेत्याला मिळू शकते संधी

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. माढा या जागेसाठी शरद पवार गटाकडून महादेव जानकरांची चर्चा होती.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Madha Lok Sabha Constituency:

महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. माढा या जागेसाठी शरद पवार गटाकडून महादेव जानकरांची चर्चा होती. तशी इच्छादेखील शरद पवारांनी बोलून दाखवली होती. मात्र याआधीच महायुतीने लोकसभेची एक जागा महादेव जानकर यांना देण्याची घोषणा केली.

जानकर महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्यामुळे आता मविआकडून माढा जागेसाठी अन्य उमेदवाराचा शोध सुरु आहे. या जागेसाठी प्राध्यापक रघुनाथ पाटील यांची चर्चा सुरू झाली आहे. रघुनाथ पाटील हे गेल्या 30 वर्षोपासून यशवंत सेना धनगर संघटनेचे संघटक म्हणून काम करत असून शरद पवार यांचे खंदे समर्थक, अशी त्यांची ओळख आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. कालपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे खुद्द जानकर यांच्याकडून सांगितले जात होते. मात्र आता ते महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

कोण आहेत रघुनाथ पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा धनगर समाजाला देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची आता चर्चा केली जात आहे. रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शिष्य आणि शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आहेत.

रघुनाथ पाटील यांनी धनगर समाजात गेली वीस वर्षे कुशल संघटक म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा चालू असल्याचे म्हटले जात आहे. यासह रघुनाथ पाटील हे मतदारसंघातील महत्त्वाच्या लोकांच्या भेटी घेत आहेत. याच सर्व घडामोडींमुळे रघुनाथ पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या जागेवर शरद पवार नेमकी कोणाला संधी देणार, याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT