Income Tax Notice To Congress  Saam Digital
लोकसभा २०२४

Loksabha Election: ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर ओडिसामध्ये मोठा गेम; काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Loksabha Election 2024: सुरत, इंदूर लोकसभेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.

Gangappa Pujari

सुरत, इंदूर लोकसभेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार  सुचारिता मोहंती यांनी निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून निवडणुक लढवण्यासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करत  सुचारिता मोहंती यांनी तिकीट पक्षाकडे परत केले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सुरत, इंदूरनंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ओडिशातील पुरीमध्ये काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप मोहंती यांनी केला आहे. पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार करणे मला शक्य नाही, त्यामुळे मी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मी तिकीट परत करत आहे, असे मोहंती यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात सुचरिता यांनी पक्षाने मला निधी देण्यास नकार दिल्याने पुरी लोकसभा मतदारसंघातील आमच्या प्रचारावर परिणाम झाला आहे. मी याबद्दल ओडिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार जी यांना सांगितले तेव्हा त्यांनी तुम्हीच व्यवस्था करा, असे म्हटल्याची तक्रारही केली आहे.

एकीकडे लोकसभेत यश मिळवण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज मैदानात उतरले असतानाच आता तिसऱ्या उमेदवारानेही माघार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुरी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून संबित पात्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संबित पात्रा हे भाजपचे स्टार प्रवक्ते आहेत. माध्यमांमध्ये ते पक्षाची बाजू मांडण्याचे काम करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

SCROLL FOR NEXT