Manasvi Choudhary
केस लांब आणि सरळ असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते यासाठी महिला पार्लरमध्ये अनेक ट्रिंटमेट देखील करतात.
मात्र सतत पार्लरमध्ये ट्रिटमेंट घेतल्याने केस देखील खराब होतात गळतात यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
नारळाचे दूध केसांना लावल्यास केस सरळ होतात केसांमध्ये गुंता देखील होत नाही.
कोरफड आणि बदामाचे तेल मिक्स करून केसांना लावा आणि २ तासांने केस धुवा यामुळे केस सरळ आणि लांब होतात.
तांदळातील अमिनो ॲसिड्स केसांना मजबुती देतात यामुळे केसांना तांदळाच्या पाण्याने धुवा यामुळे देखील केसांना फायदा होतो.
केस धुताना नेहमी कोमट किंवा थंड पाणी वापरा. गरम पाण्याने केस कधीही धुवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.