AAP MP Join BJP Saam Tv
लोकसभा २०२४

AAP MP Join BJP: काँग्रेसनंतर 'आप'ला पंजाबमध्ये मोठा धक्का, खासदार रिंकू यांच्यासह आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024: पंजाबमध्ये काँग्रेसनंतर आम आदमी पक्षालाही मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024: 

पंजाबमध्ये काँग्रेसनंतर आम आदमी पक्षालाही मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय एक आमदार शीतल अंगुरल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले.

या दोघांना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि पंजाब पक्षाचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही उपस्थित होते. पुरी म्हणाले की, ''भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि कुटुंबाचा भाग बनत आहेत. मी सुशील कुमार रिंकू आणि शीतल अंगुरल यांचे स्वागत करतो.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुरी म्हणाले, ''पंजाबमधील परिस्थिती आता बदलत आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू.'' दरम्यान, सुशील कुमार रिंक आणि शीतल यांच्या आधी लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी मंगळवारीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आजोबा बेअंत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि कट्टरवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. (Latest Marathi News)

रवनीत सिंह बिट्टू काँग्रेसचे मोठे आहेत, जे आता भाजमध्ये आहेत. रवनीत सिंह बिट्टू यांना लुधियानामधून तिकीट मिळू शकते. याशिवाय सुशील कुमार रिंकूही आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. पंजाबमध्ये भाजप यावेळी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT