Pune Rain Video  Saam TV
लोकसभा २०२४

Pune Rain Video : पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप; पाहा व्हिडिओ

Pune Rain Video : पावसामुळे काही ठिकाणी झाडांची देखील पडझड झाली आहे. ११३५ कसबा पेठ सुपेकर वाडा येथे झाडाची मोठी फांदीपडून रस्ता बंद झाला आहे.

Ruchika Jadhav

एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. गेल्या दोन तासांपासून पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन तासांपासून पाऊस सुरू आहे. अशात काही ठिकाणी मतमोजणी केंद्रात देखील पाणी साचलं आहे. ⁠कोरेगाव पार्क परीसरातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमध्ये बारामती आणि पुणे लोकसभेची मतमोजणी सुरू होती. पावसाचा जोर वाढल्याने येथे देखील पाणी भरलं. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे व्हिडिओ देखील समोर आलेत हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पावसामुळे काही ठिकाणी झाडांची देखील पडझड झाली आहे. ११३५ कसबा पेठ सुपेकर वाडा येथे झाडाची मोठी फांदीपडून रस्ता बंद झाला आहे. अग्मिशमन दलाकडून येथे दाखल होत झाड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घराकडे धाव घेतली आहे. पावसामुळे पुण्यात युतीच्या कार्यकर्त्यांच्या सेलिब्रेशनला देखील ब्रेक लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानानिमित्त मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT